Pathaan OTT Release : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'पठाण'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 02:12 PM2023-01-30T14:12:13+5:302023-01-30T14:12:38+5:30

Pathaan OTT Release : शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. मात्र यानंतर शाहरुख खानचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Pathaan OTT Release: 'Pathaan' will be released on this OTT platform after creating a storm at the box office. | Pathaan OTT Release : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'पठाण'

Pathaan OTT Release : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'पठाण'

googlenewsNext

शाहरुख खानचा 'पठाण' (Pathaan) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पाच दिवसांत जगभरात ५५० कोटींची कमाई केली आहे. OTT वर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ही ९० दिवसांची विंडो आहे. कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केवळ नव्वद दिवसांनी तो ओटीटीवर प्रदर्शित होतो. अशा परिस्थितीत 'पठाण' ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी चाहत्यांना ९० दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज होऊ शकतो.

लेट्स सिनेमा नामक ट्विटर अकाउंटने याबाबत माहिती दिली आहे. पठाण चित्रपटगृहांनंतर अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज करण्यासाठी लॉक करण्यात आल्याचे ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 'पठाण' हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेत रिलीज झाला आहे. शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांचा चित्रपट २५ जानेवारीला भारतासह जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा 'पठाण' चित्रपट सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला आहे. पठाणसोबत शाहरुख चार वर्षांनंतर सिनेमाच्या पडद्यावर परतला असून हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. अशाप्रकारे त्याच्या चाहत्यांनी प्रतीक्षा केल्यानंतर त्याला हे अप्रतिम गिफ्ट दिले आहे. पठाण केवळ भारतातच नाही तर जगभरात चांगली कमाई करत आहेत.

Web Title: Pathaan OTT Release: 'Pathaan' will be released on this OTT platform after creating a storm at the box office.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.