Join us

पायल रोहतगीने सांगितली जेलमधील आपबीती, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 1:33 PM

सोशल मीडियावर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबादमधून अटक करण्यात आली होती. मात्र आता तिला जामीन मिळाला आहे.

सोशल मीडियावर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिला अहमदाबादमधून अटक करण्यात आली होती. मात्र आता तिला जामीन मिळाला आहे. तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर मीडियाशी बोलताना तिने जेलमध्ये गेले असले तरीही मी व्हिडिओ तयार करणे बंद करणार नाही. मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करणार असल्याचं सांगितलं. याशिवाय जेलमध्ये एका रात्रीत आलेला अनुभवदेखील तिने शेअर केला.

तुरूंगात घालवलेल्या एका रात्रीविषयी बोलताना पायलने सांगितलं की, जेलमध्ये खूपच थंडी होती. तसेच ते जेल खूप घाणेरडं होतं. हे खूपच भीतीदायक होतं. त्यातही मला थंड जमिनीवर चटई अंथरुणावर झोपावे लागले होते. मी आशा करते की माझ्या आयुष्यातला हा शेवटचा अनुभव असावा. मी फिमेल जनरल वॉर्डमध्ये होते. तिथे माझ्यासोबत अनेक महिला होत्या त्यांनी त्यांचे अनुभव माझ्याशी शेअर केले ज्यामुळे मी खूप भावूक झाले होते.

पायल पुढे म्हटलं की,माझ्यासोबत तिथे ५ अट्टल गुन्हेगार होते. त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेलं जेवण खूप वाईट होतं. पण ज्यांना तिखट खाणं आवडतं त्यांच्यासाठी ते ठिक होतं. जेलमधून बाहेर आल्यानंतर मी खूप खूश आहे. त्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांची मी आभारी आहे.

पायल म्हणते की मला राजकारणात उगाच गोवण्यात आलं आहे. मी नेहमीच देशासाठी विचार करते मी माझ्या देशाचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने मला जेलमध्ये जायचे नाही. न्यालायाची मी आभारी आहे. मी जेलमध्ये गेले असले तरीही मी व्हिडीओ तयार करणे बंद करणार नाही. मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करणार. पण मी हाही प्रयत्न करेन की माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही किंवा आता झाली तशी चूक पुन्हा होणार नाही.

पायल म्हणाली, 'मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि याच आधारावर मी मोतिलाल नेहरु यांच्यावर व्हिडीओ शूट केला आणि जेलमध्ये गेले. पण त्याआधी मी अशाप्रकारे कायदेशीर कारवाईचा बळी पडू शकते असं वाटलं नव्हतं. माझ्याकडे या सगळ्याची माहिती नाही कारण माझा कोणीही वकिल नाही. त्यामुळे यापुढे मी या सर्वांपासून दूर राहून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करेन.'

टॅग्स :पायल रोहतगी