Join us

आलिया भटसाठी 'ही' व्यक्ती आहे सेलिब्रेटीसारखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 17:46 IST

आलिया भटचा नुकताच 'गली बॉय' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला व तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भटचे तिचे वडील महेश भट यांच्यासोबत खूप खास नाते आहे. एका चॅट शोमध्ये आलियाने तिच्या वडीलांसोबतच्या नात्याबद्दल सांगितले. आलियाने सांगितले की, 'माझ्या बालपणी महेश भट आपल्या कामात खूप व्यग्र असायचे त्यामुळे ते घरी फार कमी यायचे.'

आलिया म्हणाली की, 'माझ्यासाठी पप्पा नेहमीच सेलिब्रेटीसारखे होते. मी लहान होते तेव्हा ते खूप व्यग्र असायचे. त्यामुळे ते घरी कमी यायचे. त्यामुळे मी त्यांना मिस नाही केले कारण त्यांच्यासोबत जास्त वेळ नसायचे. काही वर्षांनंतर ते आमच्यासोबत वेळ व्यतित करू लागले. जेव्हा मी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली तेव्हा आमच्यात मैत्री झाली. तेव्हा मला समजले की त्यावेळी ते का बिझी असायचे. हा खूप वेळ द्यावा लागणारा जॉब आहे.'

प्रोफेशनल लाइफबद्दल आलियाच्या बोलायचे झाले तर नुकतीच ती 'गली बॉय' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले आहे. या चित्रपटात आलियासोबत रणवीर सिंग व सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'गली बॉय'ला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमाने फक्त पाच दिवसांत ८० कोटींचा गल्ला जमविला आहे. याव्यतिरिक्त आलिया अयान मुखर्जीचा सिनेमा 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. त्यात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आलिया व रणबीर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

टॅग्स :आलिया भटगली ब्वॉय