Join us  

Video : वेकअप कॉल! कतरिना कैफने शेअर केला बेडरूम व्हिडीओ, विकीची अवस्था पाहून हसू आवरणार नाही...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 6:16 PM

Katrina Kaif , Vicky Kaushal: ‘बायकोचा लव्हिंग वेक अप कॉल’, असं हा व्हिडीओ शेअर करताना कतरिनाने लिहिलं आहे.  5 तासांत 11 लाखांवर लोकांनी या विहडीओला लाईक केलं आहे. कमेंट्स तर विचारू नका...

कतरिना कैफ ( Katrina Kaif ) व विकी कौशल (Vicky Kaushal) हे बॉलिवूडचं लोकप्रिय कपल. हे कपल सतत या ना त्या कारणानं चर्चेत आहे. सध्या हे जोडपं एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आलं आहे. होय, दोघांचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. खुद्द कतरिनाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

व्हिडीओ बेडरूममधला आहे. या व्हिडीओत कतरिना विकीला झोपेतून उठवताना दिसतेय. याव्हिडिओमध्ये विक्की त्यांच्या बेडवर झोपलेला दिसत आहे आणि कतरिना त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. या व्हिडिओच्या बॅक ग्राउंडला तिच्या फोन भूत चित्रपटाचं व्हॉईस-ओव्हर वाजतोय.  ‘ मैं भूत हूं’ असं ती म्हणते आणि विक्की शॉकमध्ये जागा होतो. पण नंतर कतरिना आपली मस्करी करतेय हे पाहून  ब्लँकेट चेहºयावर झाकून तो पुन्हा झोपी जातो.

‘बायकोचा लव्हिंग वेक अप कॉल’, असं हा व्हिडीओ शेअर करताना कतरिनाने लिहिलं आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून चाहत्यांना हसू अनावर होतंय. व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स पाहायला मिळत आहेत.  सिद्धांत चतुर्वेदी आणि श्वेता बच्चन यांनी कमेंट सेक्शनमध्ये  हसणारे इमोजी पोस्ट केले आहेत.     5 तासांत 11 लाखांवर लोकांनी या विहडीओला लाईक केलं आहे. कमेंट्स तर विचारू नका.

कतरिनाचा ‘फोन भूत’ हा सिनोम लवकरच रिलीज होतोय. हा व्हिडीओ याच चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग आहे. कतरिनाने मोठ्या खुबीने व्हिडीओ बनवला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ‘फोन भूत’ येत्या 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय.‘फोन भूत’ हा कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे, त्यामुळे देखील रसिकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. या चित्रपटात कतरिनासोबत सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर मुख्य भूमिकेत आहेत.  

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलबॉलिवूड