Join us  

PHOTO : दिशा पटनीचे हॉट 'टॉपलेस' फोटोशूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2017 1:26 PM

'एम.एस. धोनी - द अनडोल्ड स्टोरी' मध्ये झळकलेली अभिनेत्री दिशा पटानी सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या नव्या कॅलेंडरमध्ये हॉट अवतारात दिसणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - 'एम.एस. धोनी - द अनडोल्ड स्टोरी' मध्ये झळकलेली अभिनेत्री दिशा पटनी सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या नव्या कॅलेंडरमध्ये हॉट अवतारात दिसणार आहे. डब्बू रतनानीसाठी तिने टॉपलेस फोटोशूट केले आहे.  दिशा पटनीने या फोटोशूटसंदर्भात सांगितले की, 'फोटोशूटमध्ये मी टॉपलेस नसून यात केवळ माझी पाठ पाहायला मिळत आहे. ही कल्पना डब्बू रत्नानीची होती. जसे त्याने करायला सांगितले तसे मी केले. तसेच या कॅलेंडरसाठी मी पहिल्यांदा फोटोशूट केले आहे.' दिशाने हा फोटो इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे.  
(सखाराम बाईंडर'मध्ये झळकणार मुक्ता बर्वे)
 
प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी प्रत्येक वर्षी एक नवीन कॅलेंडर लाँच करतो, ज्यामध्ये बॉलिवूडच्या दिग्गज स्टार्सला वेगवेगळ्या अवतारात दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. या वर्षीही बॉलिवूडमधील तारे-तारका नव्या अंदाजात-नव्या ढंगात डब्बू रतनानीच्या नव्या कॅलेंडरमध्ये पाहायला मिळणार आहेत. लवकरच डब्बू रतनानी आपलं नवे कॅलेंडर लाँच करणार आहे.  
(अभिषेकने उडवली सलमानची खिल्ली, अॅशला आवरेना हसू)
 
दरम्यान, 'एम.एस.धोनी - द अनटोल्ड' स्टोरी सिनेमानंतर दिशा पटनी आता चीनी अभिनेता जॅकी चेनसोबत चीनी सिनेमा 'कुंग फू योगा'मध्ये लवकरच दिसणार आहे.  दिशा सध्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.  या सिनेमाच्या प्रमोशनसाठीच दिशाने समुद्राच्या आता केलेल्या योगाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअरही केला आहे. हा सिनेमा 3 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.