ठळक मुद्दे ‘बजरंगी भाईजान’च्या शूटिंग दरम्यान तीव्र (high-patched) आवाजाने हर्षाली घाबरून जायची.
‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचे नाव घेतले तरी एक चेहरा हमखास आठवतो. तो म्हणजे, चिमुकल्या मुन्नीचा. ‘बजरंगी भाईजान’चे शूटींग केले तेव्हा ही मुन्नी उणीपुरी 7 वर्षांची होती. आता ती 11 वर्षांची आहे. होय, मुन्नी अर्थात हर्षाली मल्होत्रा आता 11 वर्षांची झाली आहे आणि चार वर्षांत ती बरीच बदलली आहे.
पण गेल्या चार वर्षांत या निरागसपणाची जागा स्टाईलने घेतली आहे. होय, हर्षाली आता बरीच स्टाईलिश झाली आहे. ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट करण्याआधी हषार्लीने कुबूल है, लौट आओ तृषा आणि सावधान इंडिया अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
‘बजरंगी भाईजान’मधील हर्षाली निरागसपणा आणि तिच्या चेह-यावरचे गोड हसू प्रेक्षकांच्या हृदयात घरच करून गेले होते. या चित्रपटासाठी हषार्लीची अमाप प्रशंसा झाली होती. स्क्रीन अवार्ड फॉर बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट पुरस्कारही तिने जिंकला होता.
‘बजरंगी भाईजान’च्या सेटवर हषार्ली रिकाम्या वेळेत सलमान खान व कबीर खान यांच्या मोबाईलमध्ये बार्बी गेम्स तसेच टेबल टेनिस खेळायची. सुरूवातीला ‘बजरंगी भाईजान’च्या शूटिंगदरम्यान हर्षाली सतत रडायची. सलमानचा फायटिंग सीन वा इमोशनल सीन पाहिला की ती रडू लागायची. इतकेच नाही तर सलमान खानसोबत बोलताना ती प्रचंड लाजायची. पण हळूहळू दोघांतही चांगली मैत्री झाली.
‘बजरंगी भाईजान’च्या शूटिंग दरम्यान तीव्र (high-patched) आवाजाने हर्षाली घाबरून जायची. त्यावेळी कबीर खान व सलमान खान दोघेही हर्षालीला अन्य गोष्टींमध्ये बिझी ठेवायचे. सीन समजला नाही तर हर्षाली थेट कबीर खान यांच्याकडे जायची आणि त्यांना सीनबद्दल विचारायची.