Join us

"मी माझी सीता जॅकलिनसाठी वनवासातून परतत आहे"; जेलमधून सुकेशचं जॅकलिनला 'लव्ह लेटर'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 12:36 PM

1 / 10
महाठग सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुकेश सध्या तिहार जेलमध्ये बंद आहे. पण दिवाळीच्या मुहूर्तावर सुकेशने जॅकलीनसोबतच्या लव्हस्टोरीची तुलना रामायणाशी केली आहे.
2 / 10
सुकेशने जेलमधून जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्याने लवकरच जेलमधून सुटका होईल असं सांगत अभिनेत्रीला भेटण्याचं आश्वासनही दिलं आहे.
3 / 10
पत्रात सुकेशने जॅकलिनला प्रेमाने 'बेबी' म्हटलं आणि तो तिला 'वेड्यासारखं' मिस करत असल्याचं सांगितलं. ही दिवाळी 'खूप खास' असून यावर्षी वेगळ्या सेलिब्रेशनचे संकेत दिले.
4 / 10
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 'बेबी, आपली लव्हस्टोरी महान रामायणापेक्षा कमी नाही, कारण जसे माझे भगवान राम त्यांच्या सीतेसोबत वनवासातून परतले, त्याचप्रमाणे मी पण माझी सीता जॅकलिनसाठी एका छोट्या वनवासातून परत येत आहे.'
5 / 10
'वनवासातून परत येत आहे जेणेकरून तिला परत मिळवू शकेल आणि कोणताही रावण हे होण्यापासून रोखू शकणार नाही. प्रभू श्रीरामाचे सर्व आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आता आपली वेळ आहे, बेबी.'
6 / 10
'बेबी, माझी घरी परतण्याची वेळ जवळ आली आहे, मी फक्त एकत्र राहण्याची आणि पुढच्या वर्षी प्रकाशाचा हा सुंदर उत्सव एकत्र साजरा करण्यासाठी वाट पाहू शकत नाही. तुझ्याशिवाय ही माझी शेवटची दिवाळी असेल, माय बेबी गर्ल.'
7 / 10
'जगाला वाटेल की, मी वेडा आहे पण आपल्यात काय आहे हे जगाला काय माहीत' असंही सुकेशने म्हटलं आहे. तसेच यापूर्वी सुकेशने जॅकलिनचा म्युझिक व्हिडाओ 'स्टॉर्मराइडर' ला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली.
8 / 10
चाहत्यांना २५ महिंद्रा थार रॉक्स आणि २०० आयफोन 16 प्रो देण्याची घोषणा केली होती. ज्यामुळे यूट्यूबवर तिच्या ट्रॅकला सर्वाधिक व्ह्यूज मिळतील. जॅकलीन म्युझिक व्हिडिओ 'स्टॉर्मराइडर'मध्ये दिसली होती.
9 / 10
सध्या अभिनेत्री अक्षय कुमार स्टारर 'हाऊसफुल ५' या चित्रपटाची तयारी करत आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. सुकेश जॅकलिनसाठी नेहमीच जेलमधून लव्ह लेटर लिहित असतो. ज्याची जोरदार चर्चा होते.
10 / 10
टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसतुरुंग