Year End 2022 : सरत्या वर्षात ‘या’ 10 ‘लो बजेट’ सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर केली छप्परफाड कमाई By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 5:27 PM1 / 10‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाचा बजेट फक्त 25 कोटी रूपये होता. या चित्रपटाने किती कोटी कमावले तर तब्बल 340 कोटी.2 / 10‘सरदार’ नावाचा टॉलिवूडचा सिनेमाही यंदा गाजला. कार्थी, राशी खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा बजेट होता 20 कोटी आणि या सिनेमाने कमावले 104 कोटी.3 / 10धनुष आणि नित्याचा ‘थिरूचित्रम्बलम’ हा साऊथचा सिनेमा फक्त 30 कोटींमध्ये तयार झाला. या सिनेमाने 110 कोटींची कमाई केली.4 / 10अजय देवगण, तब्बूचा ‘दृश्यम 2’ या सिनेमावर 50 कोटींचा खर्च झाला आणि या सिनेमाने 212.86 कोटींचा बिझनेस केला. अद्यापही हा सिनेमा गर्दी खेचतोय.5 / 10‘कांतारा’ या सिनेमाची यंदा जोरदार चर्चा झाली. हा सिनेमा केवळ 16 कोटींत बनून तयार झाला आणि जगभर या सिनेमाने 397 कोटींची कमाई केली.6 / 10निखिल सिद्धार्थ, अनुपमा परमेश्वरन, अनुपम खेर अशी स्टार कास्ट असलेल्या ‘कार्तिकेय 2’ या सिनेमाचा बजेट होता 16 कोटी आणि या सिनेमाने 120 कोटींचा गल्ला जमवला.7 / 10सीतारमन हा रश्मिका मंदाना, दुलकीर सलमान, मृणाल ठाकूरचा सिनेमा 30 कोटींमध्ये तयार झाला. या सिनेमाने 91.4 कोटींचा बिझनेस केला.8 / 10अदिवी शेष, प्रकाश राज, शोभिता धुपिवाला अशी स्टार कास्ट असलेल्या ‘मेजर’ या सिनेमाचा बजेट होता 32 कोटी. या सिनेमाने कमावले दुप्पट 66 कोटी.9 / 10‘777 चार्ली’ हा सिनेमा 20 कोटीत तयार झाला आणि या सिनेमाने 150 कोटींची बम्पर कमाई केली.10 / 10‘डीजे टिल्लू’ या सिनेमावर फक्त 10 कोटी खर्च झाला. या सिनेमाने 30 कोटींचा बिझनेस केला. आणखी वाचा Subscribe to Notifications