Join us

कुणी जोडलं रक्ताचं नातं, कुणी म्हटलं 'जय हिंद'; 'पठाण'ला आवडलेले चाहत्यांचे १० फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 17:24 IST

1 / 10
बॉलिवुडचा किंग शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित चित्रपट 'पठाण' उद्या (25 january) रोजी रिलीज होत आहे. ४ वर्षांनी शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता प्रचंड ताणली आहे.
2 / 10
शाहरुख खानही पठाणसाठी खूप उत्सुक दिसतोय. 'पठाण' साठी आता फक्त एक दिवस बाकी असताना शाहरुखने ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.
3 / 10
यात एका चाहत्याने हनीमून की सिनेमा असा गोंधळात टाकणारा प्रश्न शाहरुखला विचारला आहे. शाहरुखनेही त्यावर भन्नाट उत्तर दिलं आहे. तर, अनेक चाहत्यांचे फोटो रिट्वीट करत शाहरुखने धन्यवाद आणि सल्लाही दिला आहे.
4 / 10
शाहरुख खान अनेकदा ask srk या ट्विटरच्या सेशनमधून चाहत्यांशी गप्पा मारतो. आता पठाणच्या पार्शभूमीवर तर त्याने अनेकदा हे ask srk सेशन केले आहे. आजही त्याने चाहत्याचे मनोरंजन केले.
5 / 10
एका चाहत्याचा प्रश्न केली की, 'सर मागच्या आठवड्यातच लग्न झालं. आता आधी हनिमून ला जाऊ की पठाण बघायला जाऊ?' त्यावर शाहरुखनेही भन्नाट रिप्लाय दिलाय.
6 / 10
'बेटा एक आठवडा झाला आणि अजून तू हनीमूनला नाही गेला ! आता बायकोसोबत आधी पठाण बघ आणि हनीमूनला नंतर जा.', असे उत्तर शाहरुखने दिलं आहे.
7 / 10
शाहरुखला आवडलेले फोटो देखील त्याने ट्विटरवरुन रिशेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्याने चाहत्यांना धन्यवाद दिले, त्यासोबतच सल्लेही दिले आहेत.
8 / 10
जळगावमधील चाहत्यांनी प्रजासत्ताक दिन आणि पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. त्याचा फोटो शाहरुखने शेअर केला आहे. तसेच हे खूप नोबेल असल्याचंही त्याने म्हटलंय.
9 / 10
बीडमधील एका ग्रुपने संपूर्ण थेअटरच बुक केलं असून तिकीट बुकींगचे प्रिंटआऊट बाहेर काढल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यावर, शाहरुखने मजेशीर रिप्लाय दिलाय. चित्रपट पाहिल्यानंतर तिकीट योग्य पद्धतीने डिसपोज करा, असे शाहरुखने म्हटले आहे.
10 / 10
एका फोटोमध्ये शाहरुखच्या पठाण सिनेमाच्या पोस्टरला चक्क चित्रपटाच्या बुक केलेल्या तिकीटची माळ घालण्यात आली आहे.
टॅग्स :शाहरुख खानपठाण सिनेमाट्विटरबॉलिवूड