Join us

१०० कोटींचा खर्च, १५ हजार पाहुणे, १ कोटींची नवरीची साडी; असा दणक्यात पार पडलेला Jr. NTR चा शाही विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 11:39 AM

1 / 9
दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr. NTR)च्या 'RRR' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल सॉंग्सचा पुरस्कार पटकावत देशाचं नाव उंचावलं होतं.चाहत्यांना त्याच्या पर्सनल लाईफबाबात जाणून घेण्याची इच्छा आहे. आज न्युनिअर एनटीआरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्यासंबंधीत इंटरेस्टिंग गोष्टी.(Photo Instagram)
2 / 9
ज्युनियर एनटीआरचं फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. जगभरात त्यांचे अनेक चाहते आहेत आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी ते कायम उत्सुक असतात. एका कार्यक्रमादरम्यान सुमारे १० लाख लोक त्याला पाहण्यासाठी आले होते आणि एवढ्या गर्दीमुळे सरकारला सुमारे ९ विशेष ट्रेन सुरू कराव्या लागल्या होत्या, यावरुनच त्याच्या स्टारडमचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता. (Photo Instagram)
3 / 9
ज्युनियर एनटीआरने व्यावसायिक जीवनात खूप नाव कमावले, तर दुसरीकडे त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील खूप सुंदर आहे. ज्युनियर एनटीआरने लक्ष्मी प्रणतीशी विवाह केला आहे आणि त्यांचा विवाह साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या विवाहांपैकी एक आहे. ज्युनियर एनटीआरच्या विवाहाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.
4 / 9
ज्युनियर एनटीआरने २०११ मध्ये लक्ष्मी प्रणतीशी विवाह केला आणि त्यांचा विवाह दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा विवाह मानला जातो. ज्युनियर एनटीआर हा प्रसिद्ध अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचा नातू आहे. जुनिअर एनटीआरची पत्नी लक्ष्मी ही उद्योगपती श्रीनिवास राव यांची मुलगी आणि तेलुगू न्यूज चॅनल 'स्टुडिओ एन' ची मालक आहे.
5 / 9
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, लग्नाआधीही ज्युनियर एनटीआरवर गुन्हा दाखल झाला होता. त्याला २०१० मध्येच लक्ष्मीसोबत विवाह करायचा होता, परंतु त्यावेळी तिचं वय केवळ १७ वर्ष होते, त्यामुळे वकिलाने ज्युनियर एनटीआर विरोधात 'बालविवाह कायद्या'चा खटला दाखल केला होता. अखेर १ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दोघांनी विवाह केला.
6 / 9
काही रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या लग्नात सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होते आणि 18 कोटी रुपये फक्त मंडप सजवण्यासाठी खर्च करण्यात आले होते. तसेच ३ हजार पाहुण्यांशिवाय त्याचे १२ हजार चाहतेही लग्नात सहभागी झाले होते.
7 / 9
त्यांचा विवाहाचं प्रक्षेपणही दक्षिणेच्या प्रादेशिक वाहिनीवर करण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जूनियर एनटीआरची पत्नी लक्ष्मीनं विवाहाच्या वेळी १ कोटी रुपयांची साडी नेसली होती.
8 / 9
त्या दोघांच्या वयात सुमारे १० वर्षांचा फरक आहे. त्यांना आता अभय राम आणि भार्गव राम नावाची दोन मुलंही आहेत. ज्युनियर एनटीआरचे त्याच्या कुटुंबावर अतिशय प्रेम आहे.
9 / 9
'आज मी कोणी आहे, हे मला बदलण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या तिच्याशी विवाह केल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. तिने माझ्यासाठी खूप काही केले आहे आणि माझ्या घरात माझ्या आईनंतर ती माझी अँकर आहे,' असं ज्युनिअर एनटीआरनं एका मुलाखतीत आपल्या पत्नीबद्दल सांगितलं होतं.
टॅग्स :ज्युनिअर एनटीआरTollywoodलग्न