1542 फुटांवरून उलटं वाहणारं पाणी, निसर्गाचा अद्भुत नजारा By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 12:34 PM1 / 7जगभरात फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. काही निसर्गाच्या सौंदर्यानं परिपूर्ण आहेत. तसेच जगभरात अनेक सुंदर धबधबेसुद्धा आहेत, जे पाहण्यासाठी पर्यटक फार दुरून येतात. 2 / 7मोठ्या डोंगरातून उंचावरून कोसळणारा फेसाळणारा धबधबा पाहिल्यावर मन प्रफुल्लित होते. 3 / 7असाच एक कथित धबधबा सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यटकांच्या कुतूहलाचा विषय ठरतो आहे. 4 / 7सरळ वरून खाली कोसळणारा धबधबा आपण पाहतोच, पण हा कथित धबधबा जरा हटके आहे. तो वरून खाली नव्हे, तर खालून वर जात असताना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे. 5 / 7विशेष म्हणजे हा कोणताही धबधबा नसून समुद्राच्या लाटांचं पाणी हे गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेनं वर जाताना दिसतं आहे. 6 / 7डेन्मॉर्कच्या फॅरो आयलँड (Faroe Island)समुद्र किनाऱ्यावरचं हे दृश्य आहे. या समुद्राला भरती आली असून, उंचच उंच लाटा उसळत आहेत. 7 / 7. 41 वर्षांच्या सॅमी जॅकबसन यांनी ही दृश्यं टिपली असून, हा अद्भुत नजारा कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications