१९ वर्षीय राशा थडानीचं ४० वर्षीय विवाहित अभिनेत्यावर आहे क्रश, जाणून घ्या कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 10:01 IST
1 / 9रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिने 'आझाद' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटातील काम पाहून राशाचे खूप कौतुक होत आहे. 2 / 9विशेषत: राशाचे 'उई अम्मा' हे गाणे रिलीज होताच चार्टलिस्टमध्ये सामील झाले. अलीकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने सांगितले की, कोणता अभिनेता तिचा पहिला सेलिब्रिटी क्रश आहे.3 / 9१९ वर्षीय राशाने मिस मालिनीसोबतच्या मुलाखतीदरम्यान अशी गोष्ट सांगितली की तिचे वक्तव्य काही मिनिटांतच व्हायरल झाले. 4 / 9राशाला तिचा पहिला क्रश कोणता सेलिब्रिटी आहे, असे विचारण्यात आले. या प्रश्नावर राशाने असे उत्तर दिले की कियारा अडवाणीला नक्कीच हेवा वाटेल.5 / 9या प्रश्नाचे उत्तर देताना राशाने सिद्धार्थ मल्होत्राचे नाव घेतले. ती म्हणाली की केवळ मीच नाही तर अमननेही त्याच्या सह-अभिनेत्रीचे नाव घेऊन तिची निवड योग्य असल्याचे सांगितले. 6 / 9त्यानंतर अमनने सांगितले की, त्यालाही 'स्टुडंट ऑफ द इयर'मध्ये सिद्धार्थ आवडला होता. आलिया भट खूपच क्यूट दिसत होती.7 / 9अजय देवनचा नातेवाईक अमन देवगणने सांगितले की, त्याचा पहिला सेलिब्रिटी क्रश दिया मिर्झा आहे.8 / 9 सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. त्याच्या अनेक चित्रपटांनी त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर केलंय. त्याने २०२३ मध्ये कियारासोबत लग्न केले. 9 / 9सिद्धार्थ मल्होत्रा शेवटचा 'योद्धा'मध्ये दिसला होता. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित झाला आणि तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.