Join us

कुछ कुछ होता है: ६ अभिनेत्रींनी नकार दिल्यावर टीनाच्या भूमिकेसाठी फायनल झाली होती राणी मुखर्जी

By अमित इंगोले | Published: October 16, 2020 9:35 AM

1 / 7
करण जोहरने इंडस्ट्रीला अनेक चांगले रोमॅंटिक सिनेमे दिले आहेत. याच सिनेमांपैकी एक म्हणजे 'कुछ कुछ होता है'. जोहरची कथा सांगण्याची पद्धत आणि त्याच्या सिनेमातील भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या असतात. म्हणूनच 'कुछ कुछ होता है' सिनेमा ९०च्या दशकातील सर्वात सुपरहिट सिनेमा ठरला. राहुल, अंजली आणि टीना यांच्या कथेत प्रेम, भावना आणि पॅशन दाखवण्यात आलं होतं. आज सिनेमा रिलीज होण्याला २२ वर्षे झाली आहेत.
2 / 7
राणी मुखर्जीने या सिनेमात टीना मल्होत्राची भूमिका साकारली होती. राहुल पत्नी आणि प्रेयसी असलेल्या टीनाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आणि राणीचं हे रूप सर्वांच्या मनात घर करून गेलं. पण अनेकांना हे माहीत नसेल की, टीनाची भूमिका राणी मुखर्जीसाठी लिहिलीच गेली नव्हती. ती दुसऱ्या अभिनेत्रीसाठी लिहिली गेली होती.
3 / 7
करण जोहरने याबाबत सांगितले होते की, अभिनेत्री ट्विंकल खन्ना त्याचं पहिलं प्रेम होती. करण आणि ट्विंकल एकत्र एकाच शाळेत शिकले. ते बेस्ट फ्रेन्ड होते. करणने टीना मल्होत्राची भूमिका ट्विंकल खन्नासाठी लिहिली होती. ट्विंकलचं निकनेम टीना आहे. ट्विंकल ही भूमिका करण्यासाठी तयारही झाली होती. पण ११ दिवसांच्या शूटींगनंतर तिने कुछ कुछ होता है सिनेमा सोडला होता.
4 / 7
ट्विंकल खन्नाने हा सिनेमा सोडल्यावर या भूमिकेसाठी करणने दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरू केला. अशात त्याने रवीना टंडन, ऐश्वर्या राय बच्चन, तब्बू, उर्मिला आणि करिश्मा कपूर यांनाही ही भूमिका ऑफर केली होती. पण कुणीही यासाठी तयार झालं नाही.
5 / 7
अखेर ही भूमिका राणी मुखर्जीकडे गेली. राणीची ही भूमिका ९०च्या काळातील सर्वात लोकप्रिय भूमिकांपैकी एक आहे. आजही या भूमिकेची आठवण काढली जाते. या सिनेमाने अनेक अवॉर्ड्सही जिंकले. यात सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जीला मिळाला होता.
6 / 7
आश्चर्याची बाब म्हणजे करण जोहरने कधीही राणी मुखर्जीला टीनाची भूमिका देण्याचा विचार केला नव्हता. राणीने कुछ कुछ होता है ची स्क्रीप्ट वाचली होती. त्यानंतर ती करणकडे गेली आणि म्हणाली, 'केवळ मीच हा रोल करू शकते'. इतकेच नाही तर करण राणीच्या आवाजामुळे तिचे डायलॉग डब करणार होता. पण नंतर हाच आवाज ट्रेडमार्क ठरला.
7 / 7
हा दिग्दर्शक म्हणून करण जोहरचा पहिला सिनेमा होता. बॉलिवूड किंग शाहरूख खानने करणने दिग्दर्शक बनण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. अर्थातच करण जोहरने कमाल काम केलं. कुछ कुछ होता है हा सिनेमा आजही प्रेक्षक आवडीने बघतात.
टॅग्स :राणी मुखर्जीकरण जोहरट्विंकल खन्नाइंटरेस्टींग फॅक्ट्सबॉलिवूड