काजोल टॉवेल डान्स करणार नव्हती तर शाहरूखने घातलं होतं दुसऱ्याचं जॅकेट, DDLJ च्या माहीत नसलेल्या गोष्टी! By अमित इंगोले | Published: October 20, 2020 10:25 AM1 / 8तसे तर बॉलिवूडमध्ये रोमान्सवर अनेक सुपरहिट सिनेमे बनले आहेत. अशात कोणता एक सिनेमा पसंत करायचा असेल तर लोकांसाठीही विषय अडचणीचा होऊन जातो. पण असं असलं तरी काही रोमॅंटिक सिनेमांनी आपलं स्थान प्रेक्षकांच्या मनात कायम ठेवलं आहे. या सिनेमांना वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं प्रेम मिळत राहतं. असाच एक सिनेमा म्हणजे शाहरूख खान आणि काजोलचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'.2 / 8'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि अजूनही देत आहे. हा सिनेमा रोमॅंटिक सिनेमांमध्ये सर्वात जास्त गाजलेला सिनेमा मानला जातो. हा सिनेमा २० ऑक्टोबर 1995 रिलीज करण्यात आला होता. आज या सिनेमाने तब्बल २५ वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊ या सिनेमाच्या खास गोष्टी.3 / 8कुणी दिलं होतं हे टायटल? - 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमाचं टायटल अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांनी सुचवलेलं होतं. करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांच्या डोक्यात अशाप्रकारच्या टायटलचा अजिबात विचार नव्हता. किरणने शशी कपूरच्या 'ले जाएंगे ले जाएंगे' गाण्यातून हे टायटल काढलं होतं. 4 / 8अनुपम खेरना करायचा होता अमरीश पुरी यांचा रोल - सिनेमात अनुपम खेर यांची इच्छा होती की, त्यांना अमरीश पुरी यांनी साकारलेली भूमिका करायला मिळावी. ते आदित्य चोप्राकडे याबाबत बोलले सुद्धा पण त्याने नकार दिला. अनुपम खेर यांना वाटत होतं की, अमरीश पुरीचा रोल मोठा आहे. त्यामुळे त्यांना तो रोल हवा होता.5 / 8टॉवेल डान्ससाठी काजोल असहज - काजोलने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला सुरूवातीला 'मेरे ख्वाबो मे' गाणं शूट करण्यात खूप अडचण येत होती. तिला हे गाणं केवळ एका टॉवेलमध्ये शूट करण्याची आयडिया पसंत आली नव्हती. पण जेव्हा आदित्यने तिला समजावून सांगितले तेव्हा ती तयार झाली आणि शूटींग केली. गाणं सुपरहिट झालं. लोकांनी काजोलचं कौतुक केलं.6 / 8सिनेमातील आयकॉनिक जॅकेट - या सिनेमातील शाहरूखने वापरलेल्या आयकॉनिक जॅकेटचा सुद्धा एक किस्सा आहे. मुळात हे जॅकेट अभिनेता उदय चोप्राचं होतं. त्याने हे जॅकेट ४०० डॉलरमध्ये कॅलिफोर्निया्या हार्ले डेविडसन स्टोरमधून खरेदी केलं होतं. 7 / 8जेव्हा शाहरूखने काजोलला पाडलं... - 'रूक जा ए दिल दिवाने' या गाण्यात एक सीन आहे ज्यात शाहरूख खान शेवटी काजोलला खाली पाडतो. असं करण्यासाठी त्याला आदित्यने सांगितलं होतं. जेणेकरून कॅमेरात काजोलचे खरेखुरे हावभाव शूट करता येतील. याबाबत काजोलला काहीच आयडिया नव्हती.8 / 8शूटींगदरम्यान गावातील शेतकऱ्यासोबत वाद - या सिनेमातील लोकप्रिय गाणं 'तुझे देखा तो जाना सनम'चं शूटींग हरयाणातील एका गावात करण्यात आलं होतं. शूटींगसाठी पंचायतची परवानगी घ्यावी लागली होती. पण इतकं पुरेसं नव्हतं. यानंतर गावातील लोक चिडले होते. त्यांनी विचारले की, आमच्या जमिनीवर शूटींग केलं कसं? तेव्हा शाहरूख खानने पुढाकार घेत हा वाद मिटवला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications