Join us

किस्साः ‘साला कॉपी करता है’ अमिताभ बच्चनमुळे उद्ध्वस्त झालं होतं 'शक्तिमान'चं करिअर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 5:19 PM

1 / 9
बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक सेलिब्रिटी असे आहेत ज्यांचं उदाहरण दिलं जातं. पण काही सेलिब्रिटी असेही आहेत ज्यांच्या दुश्मनीचे किस्से आजही प्रसिद्ध आहेत. हे तर सर्वांनाच माहीत आहे की, अमिताभ बच्चन यांच्यासारखं स्टारडम कुणीही मिळवू शकत नाही. त्यांचासारखा कलाकार आजपर्यंत झाला नाही आणि होणारही नाही.
2 / 9
एक वेळ अशीही होती की, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सारखा अभिनय करण्याचा किंवा त्यांना कॉपी करण्याचा आरोप अभिनेता मुकेश खन्ना यांच्यावर लागत होता. हेच कारण आहे की, अमिताभ बच्चन आणि मुकेश खन्ना यांच्यात वर्षानुवर्षे तणाव कायम आहे. चला जाणून घेऊ काय आहे का किस्सा.
3 / 9
शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांनी केवळ मालिकाच नाही तर अनेक सिनेमातहीकाम केलं आहे. त्यांच्या कामाची चर्चा आजही इंडस्ट्रीत होते. आपल्या काळात त्यांनी वेगवेगळ्या भूमिकातून लोकप्रियता मिळवली होती.
4 / 9
एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. मुकेश खन्ना यांनी सांगितलं होतं की, जेव्हा ते पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांना भेटले तेव्हा त्यांनी केवळ १० ते १५ सिनेमे केले होते. आणि काही जाहिरातींमध्ये काम केलं होत.
5 / 9
या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुरू झालेल्या वादाचा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की, 'एकदा त्यांची एक जाहिरात सुरू होती. ते सूट-बूट घालून पायऱ्यांनी खाली येतात आणि मुली त्यांना वेढा देता. तेव्हा त्यांच्याजवळ एक व्यक्ती येतो.
6 / 9
या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुरू झालेल्या वादाचा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की, 'एकदा त्यांची एक जाहिरात सुरू होती. ते सूट-बूट घालून पायऱ्यांनी खाली येतात आणि मुली त्यांना वेढा देता. तेव्हा त्यांच्याजवळ एक व्यक्ती येतो.
7 / 9
तो व्यक्ती मुकेश खन्ना यांना सांगतो की, एका सिनेमादरम्यान जेव्हा तुमची जाहिरात आली तेव्हा अमिताभ बच्चन बघून म्हणाले होते की, 'साला कॉपी करता है'. मुकेश खन्ना म्हणाले की, त्यांनी पुन्हा त्या व्यक्तीला विचारलं की, ते असं म्हणाले का? हेच कारण आहे बिग बी आणि मुकेश खन्ना यांच्यात मनमुटाव आहे.
8 / 9
मुकेश खन्ना पुढे म्हणाले की, 'नंतर ही बाब मीडियात आली की, मुकेश खन्ना अमिताभ बच्चनला कॉपी करतो. याचा परिणाम त्यांच्या फिल्मी करिअरवर पडू लागला होता. एकापाठी एक त्यांचे ४ सिनेमे फ्लॉप झाले होते. त्यांचं करिअर वेगाने खाली आलं'.
9 / 9
ते म्हणाले की, लोकांना वाटत होतं की, मी अमिताभ बच्चनचा अभिनय कॉपी करतो. त्यामुळे त्यांचं करिअर बर्बाद झालं. त्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, ते कुणालाही कॉपी करत नाहीत. ते जसे आहेत तसंच काम करतात'.
टॅग्स :मुकेश खन्नाअमिताभ बच्चनबॉलिवूड