Join us

छोट्या पडद्यावरच्या या लोकप्रिय स्टार्सनी नाकारले बॉलिवूडचे बिग सिनेमे, पाहा कोण कोण आहे यादीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 5:26 PM

1 / 8
दृष्टी धामी- 5 वर्षांपूर्वी रिली झालेल्या सिंघम2 या सिनेमात अजय देवगणच्या अपोझिट करिना कपूर दिसली होती. असे म्हणतात की, करिना आधी दृष्टी धामीला हा सिनेमा ऑफर झाला होता. मात्र मधुबाला या मालिकेमुळे तिने या सिनेमास नकार दिला.
2 / 8
अंकिता लोखंडे - अंकिता लोखंडेला फराह खानच्या ‘हॅपी न्यू इअर’ची ऑफर मिळाली होती. मात्र अचानक या चित्रपटात दीपिका पादुकोणची वर्णी लागली.
3 / 8
अदा खान- एका सुपरनॅचरल ड्रामामध्ये काम केल्यानंतर अदा शर्माला अनेक चित्रपटासाठी विचारणा झाली होती. पण तिने त्यास नकार दिला.
4 / 8
मृणाल ठाकूर- मृणाल ठाकूरला आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’साठी विचारणा झाली होती. पण मृणालने म्हणे या सिनेमाला नकार दिला.
5 / 8
जय सोनी - ससूराल गेंदा फूल, संस्कार-धरोहर अपनों की अशा मालिकेमुळे लोकप्रिय झालेल्या जय सोनीने 2003 मध्ये दिल मांगे मोअर या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. मात्र यानंतर त्याने अनेक बडे सिनेमे नाकारले. मला कॅमिओ व छोट्या भूमिकांमध्ये रस नसल्याचे कारण त्याने दिले होते.
6 / 8
कपिल शर्मा -कपिल शर्माने ‘किस किस को प्यार करूं’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. याचदरम्यान ‘बँक चोर’ हा सिनेमा त्याला ऑफर झाला होता. पण बिझी असल्याने त्याने हा सिनेमा नाकारला होता.
7 / 8
मोहित रैना - मोहित रैनाला बिपाशा बासूचा ‘क्रिएचर 3 डी’साठी विचारणा केली गेली होती. मात्र त्याने ही ऑफर नाकारली होती.
8 / 8
शाहीर शेख -मला अनेक सिनेमे ऑफर केले गेलेत. पण स्क्रिप्ट चांगली नसल्याने मी सगळे नाकारले, असे शाहीर शेखने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते.
टॅग्स :बॉलिवूडअंकिता लोखंडेअदा खान