Join us

राजघराण्यातील मुलगी, पदार्पणातच बनली स्टार, पण एका MMS मुळे अभिनेत्रीच्या करिअरला लागलं ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 13:27 IST

1 / 10
अभिनेत्रीची बहीण, आई आणि आजी देखील प्रसिद्ध नायिका राहिल्या आहेत. ती राजघराण्यातील आहे. तिच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आगामी काळातील स्टार असल्याचे मानले जात होते. परंतु एमएमएस स्कँडलने सर्व काही उद्ध्वस्त केले.
2 / 10
रिया सेनने बॉलिवूडमध्ये काम केले आहे. रियाचे वडील भरत देव वर्मा त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत. ते कूच बिहारच्या राजकुमारी इला देवी यांचा मुलगा आणि जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांचा पुतण्या आहे. तिची आई मुनमुन सेन आणि आजी सुचित्रा सेन याही प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. रियाला एक मोठी बहीण देखील आहे, तिचे नाव रायमा सेन आहे.
3 / 10
वयाच्या पाचव्या वर्षी रियाने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने तिच्या खऱ्या आईच्या ऑन-स्क्रीन मुलीची भूमिका साकारली. त्यानंतर १९९१ मध्ये तिने 'विष्कन्या' चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले.
4 / 10
फाल्गुनी पाठकच्या 'याद पिया की आने लगी' या गाण्यात दिसल्यानंतर रिया सेनला ओळख मिळाली आणि 'स्टाईल' या सुपरहिट चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
5 / 10
'स्टाइल' हा कमी बजेटचा चित्रपट होता ज्याने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. अभिनेत्रीचा पुढचा चित्रपट 'झंकार बीट्स' देखील मध्यम बजेटमध्ये बनला होता आणि तो कमर्शियल हिट ठरला होता. जेव्हा रिया तिच्या यशाचा आनंद घेत होती, तेव्हा २००५ मध्ये, रिया आणि तिचा प्रियकर अश्मित पटेल यांचा एक कथित MMS क्लिप व्हायरल झाली होती.
6 / 10
व्हिडिओमध्ये रिया आणि अश्मित किस करताना दिसत होते. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघांनी ही क्लिप फेक म्हटले होते, मात्र नंतर अश्मित 'बिग बॉस'मध्ये याबद्दल बोलताना दिसला होता.
7 / 10
एमएमएस स्कँडलनंतर रियाच्या बॉलिवूड करिअरवर परिणाम झाला. डीएनए इंडियाच्या रिपोर्टनुसार, ती 'अपना सपना मनी मनी' आणि 'कयामत' सारख्या यशस्वी चित्रपटांचा एक भाग होती, पण त्याचा तिच्या करिअरला फारसा फायदा झाला नाही. हळूहळू रिया बॉलिवूडपासून दूर जाऊ लागली.
8 / 10
एमएमएस स्कँडलनंतर रियाने बंगाली, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले. काही फ्लॉप चित्रपटांनंतर रियाला दिग्दर्शक संतोष सिवनचा मल्याळम चित्रपट 'अनंतभद्रम' (२००५) द्वारे मोठे यश मिळाले.
9 / 10
अश्मित पटेलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर, रियाने तिचा जुना मित्र शिवम तिवारी याला डेट केले आणि त्यानंतर २०१७ मध्ये त्याच्यासोबत लग्न केले.
10 / 10
रियाने OTT प्लॅटफॉर्मवरही पाऊल ठेवले आणि 'बेकाबू', 'रागिनी MMS: रिटर्न्स', 'मिसमॅच 2', 'पति पत्नी और वो' आणि 'कॉल मी बे' सारख्या मालिकांमध्ये काम केले.
टॅग्स :रिया सेन