'अग्गंबाई सुनबाई'च्या शुभ्रापेक्षा सुंदर दिसते अनुरागची रिअल लाइफ पत्नी; पाहा Photo By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 2:58 PM1 / 11छोट्या पडद्यावर मध्यंतरी तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'अग्गंबाई सूनबाई'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यातलाच एक कलाकार म्हणजे चिन्मय उदगीरकर.2 / 11 या मालिकेत चिन्मयने अनुराग गोखले ही भूमिका साकारली होती. सुरुवातीला शुभ्राचा मित्र असलेला अनुराग शुभ्राच्या प्रेमात पडतो आणि या मालिकेला वेगळं वळण लागतं. 3 / 11चिन्मयची या मालिकेतील भूमिका प्रचंड गाजली. सोबतच त्याच्या प्रोफेशनल लाइफबरोबर त्याच्या पर्सनल आयुष्याचीही चर्चा चाहत्यांमध्ये रंगली.4 / 11सध्या सोशल मीडियावर चिन्मयच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. चिन्मयची पत्नी लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.5 / 11चिन्मयच्या पत्नीचं नाव गिरीजा जोशी असून ती उत्तम अभिनेत्री आहे. अनेकदा सोशल मीडियावर तिच्या चित्रपटांची चर्चा होत असते.6 / 11चिन्मय -गिरीजाचं लव्ह मॅरेज असून कुटुंबाच्या संमतीने त्यांनी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. 7 / 11गिरीजाने देखील मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे. स्वप्नील जोशी, अनिकेत विश्वास राव, गश्मीर महाजनी, सुबोध भावे यांच्यासोबत तिने स्क्रीन शेअर केली आहे.8 / 11 'गोविंदा', 'देऊळबंद', 'प्रियतमा', 'धमक', 'पावडर', 'तो आणि मी' या चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकांमध्ये झळकली आहे.9 / 11 लग्नानंतर गिरीजाचा कलाविश्वातील वावर कमी झाला असून ती तिची स्वतःची डान्स अकॅडमी ती चालवते. 10 / 11'नांदा सौख्य भरे', 'घाडगे अँड सून', 'सख्खे शेजारी' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये चिन्मय झळकला आहे. 11 / 11मेकअप, प्रेमवारी, वाजलच पाहिजे, श्यामचे वडील, गुलाबजाम या चित्रपटांमध्येही त्याने काम केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications