कपाळी चंद्रकोर, नाकात नथीचा रुबाब अनघाचा साज श्रृंगार पाहून अभिषेकचं काय तुम्हीही पडाल प्रेमात By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 6:30 PM1 / 10स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. 2 / 10या मालिकेत अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने साकारली आहे. 3 / 10या मालिकेतील अश्विनीने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. 4 / 10अश्विनी महांगडे सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. 5 / 10नुकतेच अश्विनीने मराठमोळ्या साज श्रृंगारातील फोटो शेअर केले आहेत. 6 / 10या फोटोत अश्विनीने निळ्या रंगाच्या नऊवारी साडीवर कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, सोनेरी सर आणि ठुशी परिधान केलेली दिसते आहे.7 / 10या फोटोत अश्विनी खूपच सुंदर दिसते आहे. 8 / 10अश्विनी महांगडे हिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 9 / 10या फोटोशूटमध्ये अश्विनी घोड्यावर बसलेली दिसली आणि तिच्या हातात झेंडा पाहायला मिळाला.10 / 10अश्विनी महांगडेचा हा अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications