आमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 4:38 PM1 / 7बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याची मुलगी इरा तशी कॅमेऱ्यांपासून दूर राहणे पसंत करते. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते आहेत.2 / 7इराने नुकताच एक विमानतळावरचा तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरून तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.3 / 7सध्या लॉकडाऊन असताना इरा कुठे चालली आहे असा प्रश्न काही जणांना पडला आहे तर काहींच्यामते ती सुपरस्टारची मुलगी असल्याने तिच्यासाठी या परिस्थितीत देखील प्रवास करणे शक्य आहे.4 / 7इराच्या या फोटोवर कमेंटचा अक्षरशः वर्षाव होत आहे. एवढेच नव्हे तर तुझे मास्क कुठे आहे असे देखील नेटिझन्स तिला विचारत आहेत.5 / 7इराने पोस्ट केलेल्या या फोटोत टी-शर्ट घातला असून त्यावर अल्लाह असे लिहिले आहे. त्यावरून देखील तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.6 / 7इराच्या या टी-शर्टसाठी तिला ट्रोल केले जात असले तरी क्रिकेटवर युवराज सिंगने तिच्या या टी-शर्टचे कौतुक केले आहे.7 / 7इराचा हा फोटो जुना असून हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ट्रोलिंग करणाऱ्यांना फुकटचे आमंत्रण दिले आहे असेच म्हणावे लागेल. आणखी वाचा Subscribe to Notifications