Join us

Yashpal Sharma : कधी होळीचे रंग, दिवाळीचे फटाके विकायचा ‘लगान’मधला लाखा, वाचा स्ट्रगल स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 8:00 AM

1 / 11
‘लगान’ हा सिनेमा आठवत असेल तर त्यातला लाखा नक्कीच आठवत असणार. गौरीवर एकतर्फी प्रेम करणारा लाखा आपल्या टीमला दगा देतो. लाखाची ही भूमिका अभिनेता यशपाल शर्मा यांनी साकारली होती.
2 / 11
आज यशपाल यांची अभिनेत्यासोबतच दिग्दर्शक अशीही ओळख आहे. इतकंच नाही तर त्यांच्या दोन चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. याच यशपाल यांची स्ट्रगल स्टोरी आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
3 / 11
आज यशपाल शर्मा यांचं नाव सिनेसृष्टीत आदराने घेतलं जातं. पण कधी हा अभिनेता होळीचे रंग विकायचा. सुरूवातीचं त्यांचं आयुष्य अतिशय खडतर होतं.
4 / 11
हरियाणाच्या हिस्सार येथे एका मध्यवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या यशपाल यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. गावातल्या दसऱ्याच्या रामलीलेत त्यांची भूमिका ठरलेली असायची.
5 / 11
अभिनयाची हीच आवड त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये घेऊन गेली. येथून ते मुंबईत आले आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण त्याआधी यशपाल यांनी बरेच कष्ट वेचले.
6 / 11
घरची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे 8 व्या वर्गापासूनच त्यांना काम करावं लागलं. कधी होळीचे रंग विकून, कधी दिवाळीचे फटाके विकून ते कुटुंबाला हातभार लावायचे.
7 / 11
एका सराफा दुकानातही त्यांनी काम केलं. महिन्याला 300 रूपये पगारावर त्यांनी नोकरी केली. आज यशपाल मागे वळून पाहतात तेव्हा ते नियतीचे आभार मानतात. संघर्षाच्या दिवसांमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो.
8 / 11
लहानपणापासून संघर्ष पाहिला होता. त्यामुळे 1997 मध्ये मुंबईत आल्यावर त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष त्यांनी सहज पचवला. गोविंद निहलानींच्या ‘हजार चौरासी की मां’ या चित्रपटात त्यांना पहिली संधी मिळाली.
9 / 11
अर्थात खरी ओळख त्यांना ‘लगान’ या चित्रपटाने दिली. आजही लोक त्यांना लगानच्या लाखा या नावानेच ओळखतात. ‘लगान’ हा सिनेमा त्यांना ‘सीआयडी’ या मालिकेमुळे मिळाला होता.
10 / 11
‘लगान’चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सीआयडीच्या काही एपिसोडसाठी यशपालसोबत काम केलं होतं. दिग्दर्शक बनण्याआधी गोवारीकर अ‍ॅक्टर होते. सीआयडीमधलं यशपाल यांचं काम पाहून गोवारीकर यांनी त्यांना ‘लगान’ ऑफर केली होती.
11 / 11
यशपाल यांनी गंगाजल, अब तक छप्पन, अपहरण, वेलकम टू सज्जपपूर, सिंह इज किंग, आरक्षण, गँग्स ऑफ वासेपूर, राऊडी राठोड अशा अनेक चित्रपटांत काम केलं. 2014 मध्ये त्यांनी बॉलिवूडमधून ब्रेक घेत हरियाणवी चित्रपटांत काम करायला सुरूवात केली.
टॅग्स :आमिर खानबॉलिवूडसेलिब्रिटी