कमाईमध्ये शाहरुख-सलमानवर भारी पडतोय आमिर खान; जाणून घ्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ची एकूण संपत्ती By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 11:53 AM1 / 11'थ्री इडियट्स', 'लगान,'दंगल', 'पीके' अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता म्हणजे आमिर खान.2 / 11वर्षातून एक किंवा दोन चित्रपट करणारा आमिर कलाविश्वातील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो.3 / 11विशेष म्हणजे कलाविश्वातील परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता कमाईच्या बाबतीतही परफेक्ट असल्याचं पाहायला मिळतं.4 / 11अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि रायटर अशा विविध भूमिका पार पाडणारा आमिर आज कोट्यावधींची कमाई करतो.5 / 11आमिर खानची एकूण कमाई किंवा त्यांची संपत्ती किती आहे हे आज आपण जाणून घेऊयात.6 / 11सूत्रांच्या माहितीनुसार, आमिर एका चित्रपटासाठी ५० ते ६० कोटी रुपये मानधन घेतो. तसंच तो स्वत: देखील चित्रपटांचं दिग्दर्शन आणि निर्मिती करतो.7 / 11चित्रपटांव्यतिरिक्त आमिरला जाहिरातींमधूनही पैसे मिळतात. तो एका जाहिरातीसाठी १०- १२ कोटी रुपये घेतो. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने केवळ जाहिरातींमधून वर्षाला १३० कोटींची कमाई केली आहे.8 / 11आमिर मुंबईतील उच्चभू वस्तीत राहत असून त्याच्या घराची किंमत १८ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं.आमिरने अनेक प्रॉपर्टीजमध्ये आर्थिक गुंतवणूक केली आहे.9 / 11आमिरला गाड्यांची विशेष आवड असून त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, रोल्स रॉयस, फोर्ड यांसारख्या गाड्या आहेत. त्यांची किंमत जवळपास १५ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. 10 / 11आज आमिरची एकूण संपत्ती१५६२ कोटी रुपये आहेत. कोणत्याही चित्रपट हिट झाल्यानंतर आमिर मिळालेल्या कमाईचा अर्धा भाग घेतो.11 / 11आमिर खान आतापर्यंत ६१ चित्रपटांमध्ये झळकला आहे. विशेष म्हणजे यातील त्याचे अनेक चित्रपट सुपहिट झाले आहेत. त्यातच लवकरच त्याचा लालसिंग चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (फोटो सौजन्य: अवि गोवारीकर इन्स्टाग्राम पेज) आणखी वाचा Subscribe to Notifications