Join us

आमिर खानच्या भाचीला पाहिलंय का? तिची निरागसता पाहून बाकी स्टारकिड्सलाही विसराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:39 IST

1 / 8
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या (Aamir Khan) कुटुंबातील अनेक सदस्य फिल्म इंडस्ट्रीत आहेत. एक्स पत्नी किरण राव दिग्दर्शिका आहे. तर आमिरचा मोठा मुलगा जुनैदनेही सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे.
2 / 8
पण तुम्हाला माहितीये का आमिरची एका भाची आहे जी सध्या सर्व स्टारकीड्सवर भारी पडताना दिसतेय. तिचं नाव आहे सहर हेगडे(Seher Hegde). सहर ही आमिरची बहीण निखतची लेक आहे.
3 / 8
आमिर खानची बहीण निखत नुकतीच लेक सहरला घेऊन एका इव्हेंटमध्ये आली होती. सहरला पाहून सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. तिच्या निरागस चेहऱ्यावर सगळेच फिदा झाले.
4 / 8
आमिरची बहीण निखत हेगडे या भावाबहिणींमध्ये सर्वात मोठ्या आहेत. निखत या देखील करिअरच्या सुरुवातीला फिल्ममेकर आणि मॉडेलही होत्या. त्यांनी अनेक ब्रँड्ससाठी मॉडेलिंग केली आहे. तसंच त्या आजही मालिका, सिनेमांमध्ये काम करत आहेत.
5 / 8
नंतर त्यांनी संतोष हेगडे यांच्याशी लग्न केलं. संतोष हेगडे यांनी पुणे स्थित एका औषध कंपनीत काम केलं आणि सीईओ पदावर ते निवृत्त झाले. संतोष यांचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता आणि त्यांना एक मुलगा होता.
6 / 8
संतोष आणि निखत यांची भेट राजस्थानच्या रणथंबोर जंगल सफारीवेळी झाली. पहिल्या भेटीतच ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. त्यांना सहर ही मुलगी झाली. तसंच निखत यांचं सावत्र मुलगा श्रवणशीही चांगलं नातं आहे.
7 / 8
तर निखत यांची हीच लेक सहर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिचे फोटो पाहून तुम्ही सुहाना,अनन्या, खुशी या स्टारकीड्सलाही विसरुन जाल. तिच्या निरागसतेने आणि सौंदर्याने सर्वांनाच प्रेमात पाडलं आहे.
8 / 8
२० वर्षांच्या सहरलाही अभिनेत्री व्हायचं आहे. सध्या ती अभिनयाचं प्रशिक्षण घेत आहे. सोबतच मॉडेलिंगही करत आहे. तिच्या पदार्पणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
टॅग्स :आमिर खानबॉलिवूडपरिवारसेलिब्रिटी