PHOTOS : हा सागरी किनारा..., अभिज्ञा भावे-मेहुलचं समुद्र किनारी रोमॅन्टिक फोटोशूट By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 4:23 PM1 / 8खुलता कळी खुलेना आणि तुला पाहते रे या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेचा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे. 2 / 8पण सध्या चर्चा आहे ती अभिज्ञाने शेअर केलेल्या फोटोंची. होय, अभिज्ञाने नवऱ्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत. निमित्त अर्थातच नुकत्याच साजऱ्या झालेल्या मकरसंक्रातीचं.3 / 8या फोटोशूटमध्ये अभिज्ञा व तिचा पती मेहुल दोघंही समुद्रकिनारी रोमॅन्टिक पोझ देताना दिसत आहेत. समुद्रकिनारी हातात हात घेत दोघेही रोमँटिक झाले आहेत.4 / 8अभिज्ञाने 06 जानेवारी 2021 मध्ये मेहुल पैसोबत लग्नगाठ बांधली. नुकतीच दोघांनी सुखी संसाराची दोन वर्षे पूर्ण केली आहेत.5 / 8अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. 15 वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखायचे. मात्र कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता. काही दिवसांनी हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. 6 / 8पुन्हा भेटल्यावर त्यांच्यातली मैत्री पुन्हा फुलत गेली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. मेहुलचा देखील घटस्फोट झाला असल्यानं दोघांनीही त्यांच्या नात्याला लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला.7 / 8लग्नानंतर काही महिन्यातच मेहुलला कॅन्सरचं निदान झालं. पण या कठीण काळात अभिज्ञा खंबीरपणे मेहुलच्या पाठीशी उभी राहिली. काही महिन्यांच्या उपचारानंतर मेहुल कॅन्सरमुक्त झाला.8 / 8अभिज्ञाबद्दल सांगायचे तर तिला सर्वच ओळखतात. मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात अभिज्ञा भावेचा मोठा चाहतावर्ग आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications