1 / 9अभिनेता आशिष विद्यार्थीने (Ashish Vidyarthi) ६० व्या वर्षी दुसरं लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कालच त्यांच्या दुसऱ्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. फोटोही व्हायरल झाले. त्यांनी त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.2 / 9आशिष यांनी फॅशन उद्योजिका रुपाली बरुआसोबत विवाह केला आहे. कोर्ट मॅरेजनंतरचे फोटो या कपलने फॅन्ससोबत शेअर केले आहेत.3 / 9आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर त्यांच्या पहिल्या पत्नीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. जाणून घेऊया आशिष विद्यार्थी यांची पहिली पत्नी कोण आहे. 4 / 9आशिष विद्यार्थी यांची पत्नीदेखील त्यांच्याप्रमाणेच उत्तम अभिनेत्री आहे.5 / 9आशिष यांच्या पत्नीचं नाव राजोशी बरुआ असं आहे. त्या प्रसिद्ध अभिनेत्री शकुंतला बरवा यांची राजोशी एकुलती एक मुलगी आहे.6 / 9राजोशीदेखील लोकप्रिय बंगाली अभिनेत्री असून त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.7 / 9 राजोशी विद्यार्थी या अभिनेत्री, डान्सर, गायिका आणि थिएटर आर्टिस्ट आहेत. सुहानी सी एक लडकी, 'इमली' या शोमध्येही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 8 / 9राजोशी दिसायला खूपच सुंदर असून लाईमलाईटपासून दूर राहणंच पसंत करतात आणि अगदी साधं जीवन जगतात. 9 / 9 आशिष यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगाही आहे. त्यांच्या मुलाचे नाव अर्थ विद्यार्थी आहे.