Join us

किस बाई किस! 'या' अभिनेत्याने चक्क ३७ वेळा दिला किसिंग सीनचा रिटेक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 1:30 PM

1 / 9
'प्यार का पंचनामा' या चित्रपटात पाच मिनिटांच्या मोनोलॉगमुळे सुपरहिट झालेला अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. आजच्या घडीला कार्तिक आर्यनला कोणी ओळखत नाही असं म्हणणारा एकही व्यक्ती सापडणं शक्य नाही.
2 / 9
विनोदी अभिनयापासून ते गंभीर भूमिकांपर्यंत कार्तिक प्रत्येक भूमिकेला योग्य पद्धतीने न्याय देतो. त्यामुळेच आज लोकप्रिय कलाकार म्हणून तो ओळखला जातो.
3 / 9
कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असतानाच कार्तिकला त्याचा पहिला चित्रपट मिळाला होता. 'प्यार का पंचनामा' हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर त्याने आकाशवाणी' आणि 'कांची: द अनब्रेकेबल' या चित्रपटांमध्ये काम केलं.
4 / 9
प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई दिग्दर्शित कांची या चित्रपटात कार्तिकने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याला ३७ वेळा किसिंग सीन द्यावा लागला होता.
5 / 9
'कांची' चित्रपटात कार्तिकचा मुख्य भूमिका साकारत असलेल्या मिष्टीसोबत एक किसिंग सीन होता. मात्र, हा सीन करणं कार्तिकसाठी सोपं नव्हतं.
6 / 9
कार्तिकला हा सीन करताना अनेक अडचणी येत होत्या. ज्यामुळे जवळपास ३७ वेळा हा किसिंग सीन रिटेक करावा लागला.
7 / 9
एका मुलाखतीत कार्तिकने या सीनविषयी सांगितलं होतं. सुभाष घई यांना पॅशनेट किसचा सीन हवा होता. पण, त्यावेळी मला किस करणं येत नव्हतं. त्यामुळे एक वेळ अशी आली होती की, मी थेट त्यांनाच सांगणार होतो, सर, प्लीज हा सीन कसा करु हे एकदा करुन दाखवा, असं कार्तिक म्हणाला.
8 / 9
पुढे तो म्हणतो, 'एक किसिंग सीन इतका डोकेदुखीचा ठरु शकतो असं कधीच वाटलं नव्हतं.'
9 / 9
कार्तिकने २०११ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आजवरच्या कारकिर्दीत त्याने 'प्यार का पंचनामा', 'आकाशवाणी', 'प्यार का पंचनामा 2', 'सोनू के टीटू की स्वीटी', 'लुका छुपी', 'पत‍ि पत्नी और वो' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच लवकरच तो 'भूल भलैया 2', 'फ्रेडी', 'शहजादा' आणि 'सत्यनारायण की कथा' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
टॅग्स :कार्तिक आर्यनसेलिब्रिटीसुभाष घईसिनेमा