Join us

आलिया की रणबीर? कोणाकडे सर्वात जास्त संपत्ती; जाणून घ्या दोघांचं नेटवर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 3:40 PM

1 / 11
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
2 / 11
येत्या १४ ते १७ एप्रिल दरम्यान ही जोडी लग्नगाठ बांधणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
3 / 11
सध्या सोशल मीडियावर आलिया आणि रणबीर यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. यामध्येच आता दोघांपैकी सर्वात श्रीमंत कोण याची चर्चा रंगली आहे.
4 / 11
आलिया आणि रणबीर दोघंही लोकप्रिय कलाकार आहेत. तसंच त्यांचे कुटुंबीयदेखील कलाविश्वाशी निगडीत आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाचं नेटवर्थ जास्त आहे ते पाहुयात.
5 / 11
बॉलिवूडच्या टॉप अॅक्ट्रेसमध्ये आलियाचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आतापर्यंत आलियाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
6 / 11
रणबीरदेखील लोकप्रिय अभिनेता असून तो असंख्य तरुणींच्या गळ्यातलं ताईत असल्याचं म्हटलं जातं. रणबीरने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
7 / 11
सूत्रांच्या माहितीनुसार, २०२१ पर्यंत आलियाकडे १६२ कोटी रुपये संपत्ती होती. आलिया प्रत्येक महिन्याला ६० लाखांची कमाई करते.
8 / 11
एका चित्रपटासाठी आलिया ८- १० कोटी रुपये मानधन घेते. तसंच जाहिराती, ब्रँड प्रमोशनमधूनही ती पैसे कमवते.
9 / 11
रणबीर कपूरची २०२१ पर्यंतची संपत्ती ३३० कोटी रुपये होती. तो एका चित्रपटासाठी ७-८ कोटी रुपये मानधन घेतो.
10 / 11
रणबीर चित्रपटांव्यतिरिक्त ब्रँड इंडोर्समेंटमधून जवळपास १ कोटी रुपयांची कमाई करतो.
11 / 11
रणबीर आणि आलियामध्ये रणबीर जास्त श्रीमंत आहे. तसंच त्याच्याकडे अनेक महागड्या लक्झरी कारचं कलेक्शनही आहे.
टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठरणबीर कपूरआलिया भटबॉलिवूडसेलिब्रिटी