Shreyas Talpade : नवरा प्रसिद्ध अभिनेता असूनही श्रेयस तळपदेची पत्नी राहते लाईमलाईटपासून कोसो दूर; पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 2:18 PM1 / 10मराठी आणि हिंदी रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्याने अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)ने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 10 सध्या तो झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath)मध्ये यशच्या भूमिकेत पाहायला मिळतो आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 10कलाविश्वाप्रमाणेच श्रेयस सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा तो त्याच्या अपकमिंग प्रोजेक्ट वा अन्य गोष्टींची माहिती नेटकऱ्यांना देत असतो. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 10श्रेयसच्या लग्नाला आज १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त त्याने पत्नी दिप्तीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. पती प्रसिद्ध अभिनेता असूनही दीप्ती मात्र लाईमलाईटपासून दूर राहणं पसंत करते. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 10दीप्ती आणि श्रेयसची पहिली भेट कॉलेजच्या कार्यक्रमादरम्यान झाली. दीप्तीला पाहताच श्रेयस पहिल्या नजरेत तिच्या प्रेमात पडला.(फोटो इन्स्टाग्राम)6 / 10त्यानंतर कॉलेजमध्ये कार्यक्रमाला गेल्यानंतरही त्याची नजर तिच्याकडे खिळून राहिली होती. कार्यक्रम संपल्यावर दोघांनी एकमेकांना निरोप देखील दिला. (फोटो इन्स्टाग्राम)7 / 10मात्र श्रेयासच्या मनात काहीतरी वेगळेच सुरू होते आणि शेवटी अवघ्या पाच दिवसात तो दीप्तीला भेटला. इतकेच नाही तर माझ्याशी लग्न करशील का? असे म्हणत प्रपोज केले.(फोटो इन्स्टाग्राम)8 / 10श्रेयसने प्रपोज करताच दीप्तीला धक्का बसला. एवढ्यात लग्नाचा विचार केला नसल्याचे सांगत आणि अमेरिकेला पुढील शिक्षणासाठी जावे लागणार या विचाराने तिने श्रेयासला साफ नकार दिला होता, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि दोघेही पुन्हा एकत्र भेटू, बोलू लागले.(फोटो इन्स्टाग्राम)9 / 10दरम्यान दीप्तीचे अमेरिकेला जाणेही टळले शेवटी दोन ते अडीच वर्षांनी दीप्तीने श्रेयसला होकार दिला. मानसशास्त्र तज्ञ ही पदवी प्राप्त झाल्यानंतर दिप्तीने श्रेयसबाबत घरच्यांना सांगितले तेव्हा घरच्यांनी देखील त्यांच्या लग्नाला संमती दिली.(फोटो इन्स्टाग्राम)10 / 10३१ डिसेंबर २००४ साली दीप्ती आणि श्रेयस यांचे लग्न पार पडले. श्रेयस आणि दीप्ती यांना एक मुलगी आहे, जिचे नाव आद्या आहे.(फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications