Join us

...अन् सोनू सूद म्हणाला, 'चल भाई, तू भी बैग तैयार कर'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 2:29 PM

1 / 12
लॉकडाऊन दरम्यान, केरळच्या कोची येथे अडकलेल्या छिंदवाडा येथील रहिवासी प्रवीण सोमकुंवरला अभिनेता सोनू सूदने मदतीचे आश्वासन देऊन घरी पाठवण्याची तयारी केली होती.
2 / 12
मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये केरळहून परत आलेल्या व्यक्तीने सर्व अडचणींमधून अभिनेता सोनू सूदच्या मदतीने कोची येथून कसे पोहोचलो याबद्दल सांगितले.
3 / 12
खरंतर, छिंदवाडा जिल्ह्यातील सौसर विधानसभेच्या पिपला कन्हान गावचे प्रवीण सोमकुंवर आणि त्यांचे कुटुंबीय कोरोना काळातील सोनू सूदने केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानत आहेत.
4 / 12
पिपला कन्हानचा रहिवासी प्रवीण सोमकुंवर यांनी आर्थिक अडचण आणि जबाबदारीमुळे नोकरीच्या शोधात केरळच्या कोची येथील खासगी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम सुरू केले होते.
5 / 12
लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय बंद झाल्यामुळे हॉटेल मालकाने प्रवीणला रेशनसाठी सुरुवातीच्या काळात मदत केली. मात्र, लॉकडाऊनमुळे प्रवीणची अडचण वाढू लागली. तो त्याच्या घरी पोहोचण्याची चिंता व्यक्त करू लागला.
6 / 12
अशा परिस्थितीत त्याने सोनू सूदला ट्विट करुन मदत मागितली. त्यावर सोनू सूदने लगेच रिप्लाय दिला आणि म्हणाला...चल भाई, तू भी बैग तैयार कर, एमपी छिंदवाड़ा जाने हो जा तैयार.
7 / 12
सोनू सूद यांच्या कार्यालयाने प्रवीणशी संपर्क साधला असता प्रवीणने कोची येथून लवकर घरी पोहोचण्यासाठी विमानाने नागपूरला जाण्यासाठी मदत मागितली. पण, कार्यालयाने सांगितले की, कोचीहून थेट विमान नाही, म्हणून तुम्ही या ट्रेनच्या तिकिटातून कोची येथून मुंबईला या. मुंबईतून आपल्याला विमानाचे तिकीट काढून दिले आहे आणि मुंबईत राहण्याची व्यवस्था केली आहे.
8 / 12
ज्यावेळी प्रवीण मुंबईला पोहोचला, त्यावेळी येथील हॉटेल हॉटस्पॉटमुळे सील झाले होते. ना खिशात पैसे आहेत, ना कोणी ओळखीचा आहे, आता कसे काम होईल? अशी भीती प्रवीणला वाटू लागली.
9 / 12
प्रवीणने हिम्मत केली सोनू सूदला फोन केला. त्यानंतर सोनू सूदने पेटीएमच्या माध्यमातून अन्न आणि ऑटोसाठी पैसे पाठवले आणि मुंबई सीएसटी स्थानकात थांबण्यास सांगितले. मात्र, प्रवीणला पोलिसांनी सीएसटी स्थानकात थांबू दिले नाही.
10 / 12
प्रवीणने सोनू सूदला माहिती दिली असता सोनू सूद म्हणालाकी काही वेळानंतर आम्ही गाडी पाठवतो. तुम्ही आमच्या बरोबर याठिकाणी थांबा आणि सकाळी विमानाने नागपूरला जा.
11 / 12
थोड्या वेळाने सोनू सूदच्या ऑफिसमधून फोन आला आणि ते म्हणाले की, आम्ही तुमचे तिकीट बुक करुन घेत आहोत. तुम्ही सीएसटी स्थानकावरून लवकरात लवकर मुंबई-हावडा ट्रेन पकडू शकता.
12 / 12
प्रवास खर्चासाठी पैसे ट्रान्सफर केले आहेत. 11 जुलै रोजी रात्री प्रवीणने मुंबईतून ट्रेन प्रवास सुरु केला आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळी त्याच्या घरी छिंदवाडा पोहोचला. त्यामुळे प्रवीणच्या कुटुंबातील सदस्य आणि गावातील लोक सोनू सूदचे आभार मानत आहेत.
टॅग्स :सोनू सूदबॉलिवूडकोरोना वायरस बातम्या