'कौआ बिर्याणी'मुळे प्रचंड चर्चेत आलेला विजय राज कुठे गायब झालाय? पाहा सध्या काय करतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 07:00 IST
1 / 9अभिषेक बच्चन आणि भूमिका चावला यांची मुख्य भूमिका असलेला रन चित्रपट आठवतो का? हा चित्रपट त्याकाळी बऱ्यापैकी लोकप्रिय झाला होता.2 / 9या चित्रपटात या दोन्ही कलाकाराव्यतिरिक्त आणखी एका अभिनेत्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं तो म्हणजे विजय राज.3 / 9या चित्रपटात कौआ बिर्याणी खाऊन हा अभिनेता विशेष चर्चेत आला होता. विनोदाचं उत्तम टायमिंग आणि विजय राजच्या चेहऱ्यावरील हावभाव यामुळे हा सीन चांगलाच गाजला होता.4 / 9या चित्रपटानंतर विजय राज अनेक चित्रपटांमध्ये झळकला. मात्र, या रनमधील त्याची भूमिका कोणीही विसरणं शक्य नाही. त्यामुळे सध्या हा अभिनेता काय करतो असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.5 / 9लोकप्रियता मिळवणाऱ्या या अभिनेत्याचा हा प्रवास सोपा नव्हता. कलाविश्वात येण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला.6 / 9५ जून १९६३ मध्ये दिल्लीतील एका सर्वसामान्य कुटुंबात विजय राज यांचा जन्म झाला. त्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेजमध्ये असतानाच त्याला अभिनयाची गोडी लागली.7 / 9विजय राज आजही कलाविश्वात सक्रीय असून विनोदी भूमिकांसह त्याने काही आव्हानात्मक, गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत.8 / 9विजय राजने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे.9 / 9अलिकडेच प्रदर्शित झालेल्या गली बॉय या चित्रपटात तो झळकला होता. तसंच त्याने रमा, अनवर, वेलकम, धमाल, रन, चुरा लिया है तुमने, कंपनी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.