Vaibhavi Upadhyaya: कुटुंबासाठी आपल्या मागे इतकी संपत्ती सोडून गेली अभिनेत्री वैभवी उपाध्याय By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 1:48 PM1 / 10आयुष्याचं काहीच भरवसा नाही. मृत्यू कधी कोणाला कुठे गाठेल सांगता येत नाही. टीव्ही अभिनेत्री वैभवी उपाध्यायचंच पाहा ना.. गेल्या काही दिवसांपासून वैभवी होणाऱ्या नवऱ्यासोबत हिमाचल प्रदेशमध्ये फिरत होती. (फोटो इन्स्टाग्राम) 2 / 10२३ मे बंजार येथील तीर्थन घाट फिरायला जात होते. त्याचवेळी बंजारजवळील सिधवा येथे त्यांच्या कारचे अचानक नियंत्रण सुटले आणि त्यानंतर कार रस्त्याच्या जवळपास ५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात वैभवीचा जागीच मृत्यू झाला तर जय गांधीला दुखापत झाली. (फोटो इन्स्टाग्राम) 3 / 10वैभवी उपाध्याय हे गुजराती थिएटर सर्किटमध्ये खूप लोकप्रिय नाव होतं. त्यामुळेच वैभवीच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.(फोटो इन्स्टाग्राम) 4 / 10वैभवी उपाध्याय हे गुजराती थिएटर सर्किटमध्ये खूप लोकप्रिय नाव होतं. त्यामुळेच वैभवीच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.(फोटो इन्स्टाग्राम) 5 / 10 वैभवी उपाध्याय ‘साराभाई वर्सेस साराभाई’या मालिकेत अभिनेत्रीने जस्मिनची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली. (फोटो इन्स्टाग्राम) 6 / 10यानंतर तिने ‘क्या कुसूर है अमला का’, ‘सीआयडी’, ‘अदालत’ या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. (फोटो इन्स्टाग्राम) 7 / 10 वैभवीला पहिल्यापासूनच हिमालय फार आवडायचा. इन्स्टाग्रामवरही तिचा शेवटा व्हिडिओ हिमाचल प्रदेशमधलाच आहे. (फोटो इन्स्टाग्राम) 8 / 10 अभिनेते आणि निर्माते जेडी मजेठिया यांनी सांगितले की वैभवी डिसेंबर २०२३ मध्ये जय सुरेश गांधी याच्याशी लग्न करणार होती. १४ फेब्रुवारीला तिचा साखरपुडा झाला होता. डिसेंबरमध्ये दोघे लग्न करणार होते. (फोटो इन्स्टाग्राम) 9 / 10वैभवीने २०२० साली दीपिका पादुकोणसोबत 'छपाक' आणि 'तिमिर' (२०२३) या सिनेमांमध्ये काम केलं होतं. राजकुमार राव आणि टिमरी अभिनीत सिटी लाइट्स सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होत. (फोटो इन्स्टाग्राम) 10 / 10 अॅमेझॉन मिनी टीव्हीवरील गाजलेली वेब सीरिज ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ यामध्ये वैभवीने आयुष मेहरा आणि बरखा सिंगबरोबर काम केले होते. रिपोर्टनुसार वैभवी आपल्या मागे १ दशलक्ष डॉलरची संपत्ती सोडून गेली आहे. (फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications