अभिनेत्रीचं मैत्रिणीच्या नवऱ्यासोबतच अफेअर, झाले अनेक आरोप; प्रेग्नंट राहिल्याने बांधली लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:27 IST
1 / 7बॉलिवूडमध्ये अरोरा बहिणींची नेहमीच चर्चा असते. त्या म्हणजे मलायका अरोरा आणि अमृता अरोरा (Amrita Arora). मलायका तर पापाराझींमुळे सतत सोशल मीडियावर दिसत असते. पण तिची बहीण अमृता अरोराबद्दल तुम्हाला माहितीये का?2 / 7अमृता अरोरा आज ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. अमृतानेही अभिनेत्री म्हणून करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे सिनेमे चालले नाहीत आणि ती फ्लॉप झाली. 3 / 7अमृताने २५ च सिनेमे केले. २०१५ मध्ये ती 'दरमियाँ' सिनेमात शेवटची दिसली. यानंतर तिने सिनेसृष्टीतून निरोप घेतला. मात्र ती वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली.4 / 7मूळ पाकिस्तानी असलेला इंग्लिश क्रिकेटर उस्मान अफजलसोबत तिच्या अफेअरची चर्चा होती. मात्र नंतर तिने २००९ साली बिझनेसमन शकील लडकसोबत लग्नगाठ बांधली. तो तिचा कॉलेजमध्ये मित्रही होता.5 / 7२००५ पासून अमृता आणि शकील यांच्यातील मैत्री वाढत गेली होती. मात्र तेव्हा शकील हा विवाहित होता. त्याची पत्नी निशा राणा ही अमृताची जवळची मैत्रीण होती. शेवटी २००८ साली शकील आणि निशाचा घटस्फोट झाला.6 / 7अमृतामुळेच आपला घटस्फोट झाल्याचा निशाने आरोप केला. तिला यामुळे खूप मोठा झटका लागला होता. मात्र अमृताची आई जॉयसने निशाला रोखठोक उत्तर देत सर्व लेकीवरील सर्व आरोपांचं खंडन केलं होतं.7 / 7अमृता आणि शकीर विवाहबंधनात अडकले. अमृताने २ मुलांनाही जन्म दिला. २०१० साली अजान आणि २०१२ साली रायन यांचा जन्म झाला. शकील आणि अमृताने नुकतंच गोव्यात नवीन रेस्टॉरंट सुरु केलं आहे.