निर्मात्याने केली शरीरसुखाची मागणी, तर अभिनेत्याने पकडला हात; अंकिता लोखंडेने केला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 8:46 AM1 / 10लोकप्रिय टीव्ही मालिका 'पवित्र रिश्ता' मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande). या एका मालिकेने तिला रातोरात स्टार बनवले. २००९ ते २०१४ असे तब्बल ६ वर्ष ही मालिका चालली. अंकिताला आजही लोक अर्चना याच नावाने ओळखतात.2 / 10अंकिताने अर्चना ही भूमिका साकारली तर सुशांतसिंह राजपूतने मानव ही भूमिका केली. याच मालिकेच्या सेटवर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. काही वर्षांनी सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर अंकिता मालिकेतच काम करत होती. तरी ते दोघं अनेक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. 3 / 10अंकिता लोखंडे इंडस्ट्रीत नवीन होती. त्यामुळे सुरुवातीला तिलाही काही धक्कादायक अनुभवांचा सामना करावा लागला होता. २०२१ मध्ये ती कास्टिंग काऊचलाही सामोरी गेल्याचं तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.4 / 10बॉलिवूड बबलशी बातचीत करताना अंकिता म्हणाली,'मी १८-१९ वर्षांची असताना मला साऊथ फिल्मची ऑफर आली होती. सिनेमाची माहिती देण्यासाठी मला एका खोलीत बोलावण्यात आलं. ज्या व्यक्तीने मला बोलावलं त्याने मला विचारलं की अंकिता, तुला सिनेमासाठी थोडं कॉम्प्रमाईज करावं लागेल.5 / 10ती पुढे म्हणाली,'मी तेव्हा लहान होते पण स्मार्ट होते. मी कोणालाच घाबरायचे नाही. मी त्यांना विचारलं कशाप्रकारची तडजोड करावी लागेल? मला पार्टी किंवा डिनरला जावं लागेल का? तर ते म्हणाले, तुला निर्मात्यासोबत झोपावं लागेल.'6 / 10त्याने असं म्हणताच मी त्याची तोंडावर लाज काढली. मी म्हटलं, तुम्हाला फिल्मसाठी अभिनेत्री नकोय तर निर्मात्यासोबत झोपायला मुलगी हवी आहे. टॅलेंटची कदर नाहीए.' असंही ती म्हणाली.7 / 10यानंतर त्या व्यक्तीने अंकिताची माफी मागितली. तसंच तिला परत तो सिनेमा करण्याची विनंती केली गेली. मात्र अंकिताने सिनेमाला स्पष्टपणे नकार दिला. 8 / 10अंकितासोबत काही वर्षांनी पुन्हा अशीच घटना घडली जेव्हा ती टीव्ही सोडून फिल्ममध्ये आली. अंकिता म्हणाली,'यावेळी तर एका मोठ्या अभिनेत्यासोबत तसा प्रकार झाला. मी त्या अभिनेत्याचं नाव घेणार नाही कारण तो खूप प्रसिद्ध अभिनेता आहे.'9 / 10'त्याने माझा हात पकडला तेव्हाच मला निगेटिव्ह व्हाईब्स आल्या. मी लगेच हात झटकला. मला कळलं की इथे आपलं काम नाही. इथे घेणंदेणं फार होतं. म्हणून मी लगेच तिथून निघून गेले.'10 / 10अंकिता आणि तिचा पती विकी जैन 'बिग बॉस 17' मध्ये प्रवेश करणार आहेत. तिने यासाठी सर्वात जास्त फीस आकारल्याची चर्चा आहे. तसंच कपडे रिपीट होऊ नये म्हणून ती चक्क २०० कपडे घरात घेऊन जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications