वयाच्या २० वर्षी लग्न अन् घटस्फोट, २६ व्या वर्षीही तेच घडलं; दोन मुलींची आई आहे ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 13:20 IST
1 / 7'बडे अच्छे लगते है' मालिकेत दिसलेली अभिनेत्री आठवतेय का? 'करले तू भी मोहोब्बत', 'नागिन','दिल से दिल तक' यासारख्या अनेक मालिकांमध्ये तिने साईड रोल्स केले.2 / 7ही अभिनेत्री आहे चाहत खन्ना. चाहतचं प्रोफेशनलपेक्षा वैयक्तिक आयुष्यच जास्त चर्चेत राहिलं.3 / 7चाहतने २००६ साली भरत नरसिंघानीशी लग्न केलं होतं. तेव्हा ती केवळ २० वर्षांची होती. लग्नानंतर वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला.4 / 7पहिलं लग्न मोडल्यानंतर चाहतने २०१३ साली तिने फरहान मिर्जाशी प्रेमविवाह केला. दुसऱ्या लग्नानंतर चाहतचं वैवाहिक जीवन सुखी होतं. चाहत आणि फरहानला दोन मुलीही झाल्या.5 / 7मात्र लग्नानंतर पाच वर्षांनी २०१८ मध्ये फरहानबरोबर घटस्फोट घेण्यासाठी तिने कोर्टात धाव घेतली. चाहतने तिच्या नवऱ्यावर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप लावला. गरोदरपणातही तिला त्रास दिल्याचा तिने दावा केला.6 / 7फरहान संशय घेत असल्याचं तिने सांगितलं होतं. त्याबरोबरच इच्छा नसतानाही जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तो भाग पाडत असल्याचा खुलासाही तिने केला होता.7 / 7मुलींसाठी हे सगळं सहन करत असल्याचं चाहतने सांगितलं होतं. आता चाहतची एक मुलगी तिच्याजवळ राहते तर दुसरी मुलगी फरहानजवळ असते.