वयाच्या ४६ व्या वर्षीही अविवाहित आहे 'ही' अभिनेत्री, आईने अपहरण होण्यापासून वाचवलं होतं By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 3:24 PM1 / 9बॉलिवूडमधील अतिशय प्रभावी अभिनेत्री म्हणून दिव्या दत्ताकडे (Divya Dutta) ओळखली जाते. आज दिव्या 46वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये आऊटसायडर असूनही तिने आपल्या टॅलेंटने वेगळं स्थान निर्माण केलं.2 / 9दिव्याची आई सरकारी डॉक्टर होती तर दिव्या लहान असतानाच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. दिव्या आणि तिच्या भावाला तिच्या आईने एकटीने सांभाळलं. लुधियानाजवळील एका गावात दिव्याचं बालपण गेलं. 3 / 9दिव्याने कधीच विचार केला नव्हता की ती एक दिवस बॉलिवूडमध्ये प्रवेश करेल. कारण त्यांची परिस्थितीच अशी होती की तिच्यासाठी हे केवळ स्वप्नच होतं. दिव्याच्या लहानपणीचा एक किस्सा आहे जेव्हा तिचं अपहरण होता होता राहिलं होतं. तिच्या आईने जीवाची बाजी लावत तिला वाचवलं होतं.4 / 9'मी अँड माँ' या आत्मचरित्रात दिव्याने याचा उल्लेख केला आहे. तसंच १९८४ च्या शीख दंग्यात त्यांची काय हालत झाली होती हे देखील यामध्ये लिहिलं आहे.5 / 9अपहरणाची आठवण सांगताना दिव्याने लिहिले,'एका संध्याकाळी आमच्या घरी एक पत्र आलं.या पत्रामुळे आम्हाला धक्काच बसला. जर पैसे दिले नाहीत तर डॉक्टरांच्या मुलांचं अपहरण करण्यात येईल असं त्या पत्रात लिहिलं होतं. 6 / 9आईला असं वाटलं की ती त्या अपराधींचा मुकाबलाच करत आहे. हे धमकीवजा पत्र होतं. तिने पोलिसांना फोन केला आणि ते लगेच आमच्या घरी आले. त्यांनी राहुलची पाठ थोपटली आणि काळजी करु नका असं सांगितलं.7 / 9सर्वात छान गोष्ट ही होती की गल्लीतील सगळे आमच्या घरी आले कारण डॉक्टर साहेबा आणि त्यांच्या मुलांना काहीही झालं नाही पाहिजे यासाठी ते काहीही करु शकत होते. कारण आई नेहमीच त्यांच्या गरजेला धावून गेली आहे. एकदम फिल्मी सीन झाला होता.8 / 9पोलिस, आई आणि शेजारी पत्रात लिहिलेल्या पत्त्यावर पैसे घेऊन गेले. तर आम्हाला आजीच्या घरी सोडण्यात आलं होतं. आम्ही आईच्या परतण्याची वाट पाहत होतो. काही तासांनंतर आई आली तेव्हा जीवात जीव आला.9 / 9४६ वर्षांची दिव्या आजही अविवाहित आहे. ती १९ वर्षांची असताना तिला एक स्थळ आलं होतं मात्र आईने नकार दिला होता. २००५ मध्ये दिव्याने लेफ्टनंट कमांडर संदीप शेरगिलसोहत साखरपुडा केला. मात्र काही मतभेदांमुळे ते तुटलं. आणखी वाचा Subscribe to Notifications