आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, मग घटस्फोट; पोटच्या मुलीपासून दूर राहते 'ही' अभिनेत्री By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 3:02 PM1 / 8राम कपूर आणि प्रिया यांच्या 'बडे अच्छे लगते है' मालिकेतली खलनायिका आठवतेय? तिने राम कपूरच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. सध्या अभिनेत्री एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे.2 / 8ही अभिनेत्री आहे ईवा ग्रोवर(Eva Grover). ईवाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले. नात्यात आलेल्या अपयशावर तिने भाष्य केलं. नातं तुटलं पण संकटं काही कमी झाली नाहीत. असं काय घडलं ईवाच्या आयुष्यात वाचा.3 / 8ईवा ग्रोवरने नुकतंच कॉफी अनफिल्टर्ड पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने लग्न, घटस्फोट आणि आयुष्यातील दु:खद प्रसंगांवर भाष्य केलं. ती म्हणाली, 'मी पंजाबी कुटुंबातील आहे. माझे आईवडील आंतरधर्मीय लग्नाच्या विरोधात होते. पण मला माझ्यावर प्रेम करणारा पती आणि छान कुटुंब हवं होतं. म्हणून मी घरातून पळून जाऊन लग्न केलं.'4 / 8अभिनेत्री आमीर खानचा सावत्र भाऊ हैदर अली खानच्या प्रेमात होती. त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगीही झाली. मात्र नंतर तिने पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला. लग्नाच्या पाच वर्षांनंतर २००८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 5 / 8ती म्हणाली, 'लग्नानंतर ४ दिवसातच मला जाणवलं की मी जसा विचार केला होता तसं हे आयुष्य नाहीए. मी लग्न वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मूल होईल तर सगळं ठीक होईल असं मला वाटलं होतं. मात्र लेकीच्या जन्मानंतरही परिस्थिती सुधारली नव्हती.'6 / 85 वर्ष नात्यात राहिल्यानंतर मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. माझी मुलगी फक्त ३ वर्षांची होती. तिच्या कस्टडीसाठी मला खूप झगडावं लागलं. नंतर मी लेकीसोबत पुन्हा आईबाबांसोबत राहत होते आणि दिवसरात्र कामही करत होते.'7 / 8'एक दिवस शूटवरुन आल्यानंतर आईला विचारलं की मिष्ठा कुठे आहे? तर ती म्हणाली मी तिला देऊन टाकलं. माझी आईला विचारण्याचीही हिंमत झाली नाही की कोणाला दिलं? कारण मी आधीच लग्न तिच्याविरोधात जाऊन केलं होतं. मी १० वर्षांपर्यंत तिला पाहिलंही नाही. आता ती हैदरच्या बहिणीसोबत राहते. आता मी तिला कधीकधी भेटते. ती स्वत:च मला निघून जा म्हणते.'8 / 8ईवा सलमान खानच्या 'रेडी' सिनेमातही दिसली होती. तसंच ती शेवटची 'टशन ए इश्क' या मालिकेत झळकली. तर हैदर अली खान हा फिल्ममेकर ताहिर हुसैन यांचा छोटा मुलगा आहे. तो आमीर खानचा सावत्र भाऊ लागतो. हैदरने 'दिल तो दिवाना है' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications