Join us  

अभिनेत्री हिना खानचा 'देसी गर्ल' लूक, फोटो चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 5:58 PM

1 / 10
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हिना खान.
2 / 10
हिना खान ही ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करत आहे.
3 / 10
आता हिनाने चित्रपट आणि ओटीटीवर फोकस केला आहे. तर 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटामुळे ती चर्चेत आहे. इंग्रजी कादंबरीकार एचजी वेल्स यांच्या कथेवर आधारित या चित्रपटात हिना खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
4 / 10
हिना खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हिना खान तिच्या फोटोशूटमुळेही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
5 / 10
हिना खानने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या एथनिक लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
6 / 10
या फोटोंमध्ये हिना खानने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यावर तिनं सुंदर असे झुमके कॅरी केले आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
7 / 10
हिना खानने न्यूड लिपस्टिक आणि डोळ्यांच्या मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.
8 / 10
हिना खान कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. हिना खानचा हा देसी लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
9 / 10
आता हिना खानच्या चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. या फोटोंवर ते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.
10 / 10
अभिनेत्री हिना खान हे टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. 'नागिन', 'बिग बॉस', 'यह रिश्ता क्या कहलाता है' यासारख्या मालिकांमधून तिने छोट्या पडद्यावर दबदबा निर्माण केला आहे.
टॅग्स :हिना खानसेलिब्रिटीटेलिव्हिजनसोशल मीडिया