“तिला काम मिळणार नाही.." हृता दुर्गुळे ठरली बॉडी शेमिंगची शिकार, अभिनेत्री संतापली म्हणाली-“माझं वजन…” By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 9:52 AM1 / 10अनेक तरुणांची क्रश असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळ (hruta durgule). उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे हृताने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 10'फुलपाखरु' या मालिकेपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या हृताने मोठ्या पडद्यापर्यंत उडी मारली आहे. सध्या ती तिच्या सर्किट चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 10ह्रताला या प्रवासादरम्यान अनेक चांगल्या वाईट प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. याबाबत तिनं पहिल्यांदाच भाष्य केलंय. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 10सुलेखा तळवळकर यांच्या 'दिल के करीब' या कार्यक्रमा दरम्यान ह्रताने तिच्या बाबतीत घडलेला एका प्रसंग सांगितला. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 10 एका पार्टी दरम्यान तिच्या वाढलेल्या वजनावर कमेंट करण्यात आली होती. यावर तिनं भाष्य केलं. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 10ह्रता म्हणाली, ''अलिकडेच एका पार्टीमध्ये कोणीतरी माझ्या वजनाबाबत कमेंट केली होती. कारण मध्यंतरी माझं वजन वाढलं होतं.'' (फोटो इन्स्टाग्राम)7 / 10''पार्टीत एका व्यक्तीने म्हटलं होतं की बरं झालं ह्रताचं वजन वाढतंय त्यामुळे तिला कामं तरी मिळणार नाहीत. (फोटो इन्स्टाग्राम)8 / 10त्यामुळे तिची काम तरी निदान आम्हाला मिळतील. त्यावेळी त्या पार्टीमध्ये मी नव्हते. मला माझ्या जवळच्या एका व्यक्तीने हे सांगितलं. मी माझं वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत होते.'' (फोटो इन्स्टाग्राम)9 / 10ह्रता पुढे म्हणाली, मी अशा बऱ्याच प्रसंगांचा वेळा सामना केला आहे. पण माझ्याबाबत केलेली अशी कमेंट ऐकून मला असं वाटलं की, लोक आपल्याबाबत असं कसं बोलू शकतात?, (फोटो इन्स्टाग्राम)10 / 10 काम मिळवण्यासाठी मला अशा गोष्टींची गरज वाटत नाही. पुढे जाण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचे पाय खेचणं चुकीचं आहे. (फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications