लेकाच्या जन्मानंतर आलं डिप्रेशन; लग्नाआधी प्रेग्नंसी अन् पार्टनरबद्दल इलियानाने केला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 1:05 PM1 / 9'बर्फी' फेम अभिनेत्री इलियाना डिक्रुझ (Ileana D'cruz) बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. आधी ब्रेकअप मग अचानक प्रेग्नंसी यामुळे अभिनेत्री मधल्या काळात चर्चेत आली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तिने मुलाला जन्म दिला. 2 / 9लेकाच्या जन्मानंतर तिने काही दिवसांनी त्याचे वडील कोण याचं गुपित उघड केलं. आता इलियाना पहिल्यांदाच या सर्व गोष्टींवर दिलखुलास बोलली आहे.3 / 9*पोस्टपार्टम डिप्रेशनचा सामना* इलियाना म्हणाली,'आई झाल्यानंतर मला डिप्रेशनचा सामना करावा लागला. मॉम गिल्ट सारखे विषय वास्तवात खरोखरंच आहेत. मी माझ्या खोलीत होते आणि खूप रडत होते. माझ्या पार्टनरने मला विचारले की काय झालं? मी म्हणाले की हा वेडेपणा वाटेल पण माझा मुलगा बाजूच्या खोलीत झोपला आहे आणि मला त्याची आठवण येत आहे.'4 / 9प्रेग्नंसीच्या या प्रवासात मी अनेक अडचणींचा सामना केला. पण या काळात माझ्यासोबत माझं कुटुंब आणि मित्रपरिवार होता. मी आईचे आभार मानेन. कारण ती संपूर्ण प्रवासात माझ्यासोबत होती. तिच्याशिवाय मी काहीच करु शकले नसते. 5 / 9पोस्टपार्टम डिप्रेशनचा महिलांवर परिणाम होतो. हा एक गंभीर मानसिक आजार आहे. याचा महिलांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होतो असंही ती म्हणाली. 6 / 9लग्नाआधीच गरोदर राहिल्याने माझ्याबद्दल बरंच काही बोललं गेलं. पण काही गोष्टी या गुपितच राहिल्या पाहिजेत. मला फार वाईट वाटलं जेव्हा लोकांनी माझ्या कुटुंबालाही नावं ठेवली. मायकलबद्दल काहीही बोलले. मी स्वत:बद्दल काहीही ऐकू शकते पण माझ्या कुटुंबाबद्दल नाही. 7 / 9*मी खूपच नशिबवान की मला असा पार्टनर मिळाला* इलियाना म्हणाली,'माझा पार्टनर मायकल डोलन खूपच चांगला व्यक्ती आहे याचा मला आनंद आहे. मला त्याला काहीही समजवण्याची गरज पडत नाही. तो मला माझा वेळ देतो आणि जेव्हा मी काम करायला जाते तेव्हा तो मुलाचा सांभाळ करतो.'8 / 9नवीन वर्षाबद्दल इलियाना म्हणाली,'हे वर्ष माझ्यासाठी वैयक्तिकरित्या आणि प्रोफेशनलदृष्टीने खूपच खास आहे. मला आशा आहे की यावर्षी माझे चित्रपट प्रदर्शित होतील. कोआ आणि मायकलसोबत मी सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात येईन. 9 / 9इलियाना आधी कतरिना कैफच्या भावाला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र या सगळ्या अफवा निघाल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications