साडीत खुललं कंगनाचं सौंदर्य, फोटो पाहून चाहते घायाळ By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 6:01 PM1 / 11आपल्या बिधास्त विधानांनी सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत.2 / 11 कधी सिंपल साडीत तर कधी रॉयल लुकमध्ये कंगना पाहायला मिळते.3 / 11 भारतीय पारंपारिक कपड्यात ती खूपच सुंदर दिसते.4 / 11कंगना सोशल मीडियावर सक्रिय असते. ती कायम आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.5 / 11नुकतेच कंगनाने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 6 / 11अभिनेत्रीने निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. कंगनाने हा लूक रेट्रो पद्धतीचा ठेवला आहे.7 / 11कंगनाचा हा लूक ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांच्या लूकवरून प्रेरित असल्याचं तिनं सांगितलं.8 / 11तिचा हा लुक रॉयल वाइब्स देत आहे. यावेळी तिच्या कपड्यांमध्ये ग्लॅमर आणि पारंपारिकतेचा परफेक्ट मिलाफ पाहायला मिळत आहे. अनेकांनी तिच्या या लुकची प्रशंसा केली आहे.9 / 11क्वीन कंगना रणौत तिच्या सोशल मीडिया हँडलवर नेहमीच चांगले फोटो शेअर करते. 10 / 11कंगनाच्या वर्कफ्रंटबद्ल बोलायचे झाल्यास, अलिकडेच तिचा ‘तेजस’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात कंगना 'पायलट'च्या भूमिकेत पाहायला मिळाली. 11 / 11तसेच ती आता 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ती स्वतः करत आहे. यात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications