कास्टिंग काऊचबाबत अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; डायरेक्टरनं प्रपोजल दिलं मग... By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 12:23 PM1 / 9एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री अनेकदा कास्टिंग काऊचवर बोलताना दिसतात. अलीकडेच 'ये रिश्ते हैं प्यार के' अभिनेत्रीनेही यावर मोकळेपणाने बोलली. ये रिश्ते हैं प्यार के (Yeh Rishtey Hain Pyaar Ke) मधील कुहूनं यावर भाष्य केले आहे. या शोमध्ये कुहूची भूमिका कावेरी प्रियमने साकारली होती.2 / 9'ये रिश्ते हैं प्यार के' मधून कावेरीला घरोघरी ओळख मिळाली. पण हो, तिचा अभिनय प्रवास वाटतो तितका सोपा राहिलेला नाही. इंडस्ट्रीत संघर्ष करत असताना कावेरीला कास्टिंग काऊचलाही सामोरे जावं लागले होते, ज्याचा खुलासा तिने आता केला आहे.3 / 9कावेरी प्रियमने 'ये रिश्ते हैं प्यार के' या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या शोमध्ये तिने नकारात्मक व्यक्तिरेखा म्हणून स्वत:ची छाप पाडली. त्याच वेळी, ती आता 'जिद्दी दिल माने ना' मध्ये डॉ. मोनामीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. 4 / 9'E-Times'ला दिलेल्या मुलाखतीत कावेरीने आपल्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलताना सांगितले की, पदार्पणापूर्वी तिला खूप त्रास सहन करावा लागला आहे. अभिनेत्री बनण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन कावेरी मुंबईत आली होती. कदाचित तेव्हा तिला कशाला सामोरे जाणार आहे हेच कळले नसेल. 5 / 9मायानगरीत तिला रस्ता दाखवणारे कोणी नव्हते. ऑडिशन्स कुठे आणि कशा द्यायच्या हे सांगायला कुणीच नव्हतं. तिला अशा अभिनेत्रींबद्दल सांगण्यात आले ज्यांनी शॉर्टकट मार्ग स्वीकारला आणि मोठं यश मिळवलं असं तिने सांगितले. त्यावेळी कावेरीने या सर्व गोष्टींवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, पण आपल्या मेहनतीच्या जोरावर ती पुढे जाईल, असा निर्धार तिने केला होता.6 / 9मुलाखतीत तिच्या मागील दिवसांची आठवण करून देताना कावेरीने सांगितले की, कास्टिंग डायरेक्टरने तिला एक प्रस्ताव दिला ज्यामुळे ती अस्वस्थ झाली. कास्टिंग डायरेक्टरचे म्हणणे ऐकून कावेरीला मोठा धक्का बसला. ती आतून खूपच तुटलेली होती. 7 / 9मी ऑटोमध्ये बसताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी अभिनेत्री होण्यासाठी खूप मेहनत केली. आणि ती जितकी मेहनत करत होती. त्याला तितकीच वाईट वागणूक दिली जात होती. अनेक प्रश्न मनात घोळत होते असं कावेरीनं खंत व्यक्त केली. 8 / 9या प्रश्नांसह कावेरीने अनेक गोष्टींचा विचार केला. पण नंतर तिचे अश्रू पुसले आणि स्वतःला वचन दिले की ती एक अभिनेत्री बनूनच दाखवणार. तेही तिच्या कलेवर. इतकेच नाही तर एकदा एका दिग्दर्शकाने कावेरीकडे ब्रेक देण्यासाठी पैशांची मागणीही केली होती. तिला कमकुवत करण्याचाही प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टींनी ती खूप निराश झाली होती.9 / 9त्यानंतर कुटुंबीयांना फोन करून कावेरीनं सर्व काही सांगितले. घरच्यांच्या समजावण्यावरून कावेरी पुन्हा उभी राहिली आणि तिच्याशी पुन्हा असं कुणी बोलू नये अशा पद्धतीने वागली. दोन वर्षांच्या संघर्षानंतर कावेरीला 'ये रिश्ते हैं प्यार के'मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि आज सगळे तिला ओळखतात. आणखी वाचा Subscribe to Notifications