बाबो..! केतकी माटेगावकरचं झालंय लग्न?, अभिनेत्री म्हणाली - 'माझं लग्न आधीच झालंय...' By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 4:55 PM1 / 7अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिने आपल्या अभिनय आणि सुरेल स्वरांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. केतकीने आतापर्यंत अनेक सिनेमात काम केले आहे.2 / 7केतकी माटेगावकर हिने ‘तानी’, ‘शाळा’, ‘काकस्पर्श’, ‘टाइमपास’, ‘फुंतरू’ यांसारख्या चित्रपटात काम केले असून यातील तिच्या अभिनयाचं कौतुक देखील झाले आहे. दरम्यान आता अभिनेत्री एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. 3 / 7केतकी माटेगावकर हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ज्यात तिने तिचे आधीच लग्न झाल्याचे म्हटले आहे. तिचे हे वक्तव्य ऐकून चाहतेही थक्क झाले आहेत.4 / 7केतकी माटेगावकरला 'अल्ट्रा बज मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल विचारणा करण्यात आले. त्यावर तिने माझं लग्न आधीच झालंय आता काय असं म्हटलं. 5 / 7त्यावर तिला पुन्हा तू खऱ्या आयुष्यात कधी लग्न करतेयस असं विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, 'माझं लग्न झालं आहे. म्युझिकबरोबर. माझ्या आजीने मला एकेदिवशी अगदी भंडावून सोडलं होते. लग्न कर, लग्न कर. 6 / 7आजीला केतकी म्हणाली की, मी तिला माझ्या बोटावर असलेला टॅटू दाखवला आणि म्हणाले की मी म्युझिकसोबत लग्न केलं आहे. आता जो कुणी माझ्या आयुष्यात येईल ते माझं दुसरं लग्न असेल. 7 / 7माझा पहिला नवरा हे माझं म्युझिक आहे. त्यामुळे काहीही झालं तरी दुसऱ्या नवऱ्याला त्याच्याशी जमवून घ्यावं लागेल., असे केतकीने मुलाखतीत सांगितले. केतकीच्या या उत्तराने तिचे म्युझिकवर असलेलं प्रेम दिसून आले. तिचे हे उत्तर ऐकून चाहतेही खूश झाले. आणखी वाचा Subscribe to Notifications