बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री? By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 10:59 PM1 / 7महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. प्रत्येक पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहे. त्यात महायुतीतून बाहेर पडून महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जानकरांनी हा निर्णय घेतला. त्यात मुंबईत जानकरांच्या पक्षाला ग्लॅमरस चेहरा मिळाला आहे.2 / 7मुंबईतील सिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून काम करणारी महक चौधरी हिने राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश घेतला आहे. महादेव जानकरांच्या उपस्थितीत महक चौधरींचा प्रवेश झाला असून त्यांच्यावर राष्ट्रीय समाज पक्षाने मुंबई महिला अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. महक चौधरी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 3 / 7कोण आहे महक चौधरी? स्वप्ने मोठी पाहावी मग तुम्ही छोट्या गावात राहत असो वा मोठ्या शहरात..असेच स्वप्न पाहणारी महक चौधरी उत्तर प्रदेशातील कृष्णनगरी मथुरा येथून मुंबईत आली. बॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवत तिने मुंबई गाठली. अल्पावधीत तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. 4 / 7१९९६ साली सामान्य कुटुंबात जन्मलेली महक चौधरी हिने कमी वयात तिच्या करिअरची सुरुवात केली. तिला अभिनेत्री व्हायचं होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मुंबईत आली. तिच्या या निर्णयाला कुटुंबानेही साथ दिली. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला बऱ्याचदा संघर्ष करावा लागला. 5 / 7कुटुंबाने महकला साथ दिली मात्र अभिनेत्री बनण्यासाठी तिला खूप धडपड करावी लागली. काम मिळवण्यासाठी सातत्याने विविध निर्मात्या कंपन्यांचे उंबरठे झिजवणे, दिवसभर वाट पाहणे, कामासाठी एखादा ब्रेक मिळेल का याची ती वाट पाहायची. मात्र मेहनतीने तिने कधी हार मानली नाही.6 / 7महक चौधरीनं सुरुवातीला अभिनयाच्या दुनियेत छोटी-मोठी कामे मिळवून मुंबईसारख्या शहरात स्वत:चा उदरनिर्वाह केला. अनेक जाहिराती फिल्म्स, साऊथ फिल्म्स आणि नंतर वेब शोमध्ये काम करून तिने एक अभिनेत्री म्हणून म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. 7 / 7मथुराच्या कृष्ण नगरीत राहणारी महक चौधरीने अभिनय क्षेत्रात करिअर सुरू करण्यापूर्वी काही काळ मॉडेलिंगही केले आहे. ॲड फिल्म्स, साऊथ फिल्म्स आणि वेब शोमध्ये हात आजमावल्यानंतर तिचं हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचे सर्वात मोठे स्वप्न होते. मात्र आता महक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications