Join us

“प्रसिद्धीसाठी त्याने…”, घटस्फोट आणि नवऱ्याबाबत मानसी नाईकचा मोठा खुलासा, रडत म्हणाली, “माज दाखवतात…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 15:44 IST

1 / 10
वाट माझी बघतोय रिक्षावाला' या गाण्यामुळे रातोरात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक (Manasi naik). अभिनयापेक्षा मानसी तिच्या म्युझिक अल्बम आणि सोशल मीडियावरील वावरामुळे सर्वाधिक वेळा चर्चेत येते.
2 / 10
मानसी गेल्या काही दिवसांपासून कलाक्षेत्रापासून दूर आहे. पण ती तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे.
3 / 10
नुकतंच मानसीने अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले. यावेळी तिने तिचं लग्न, घटस्फोट आणि इतर अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला.
4 / 10
मानसी म्हणाली, “मला नेहमीच एक सून म्हणून, बायको म्हणून माझं कुटुंब हवं होतं. ते स्वप्न माझं अपुरं राहिलं आहे. पण मी आता ते मी नक्कीच पूर्ण करेन. कारण माझा प्रेमावरचा विश्वास उडालेला नाही.
5 / 10
''मला त्यांच्या युट्यूब चॅनलसाठी वापरण्यात आलं. महाराष्ट्रीयन प्रेक्षक मिळवण्यासाठी माझा वापर करण्यात आला. त्यावेळी मला काहीही वाटत नव्हतं.''
6 / 10
''जेव्हा कोणतीही मुलगी लग्न करते, तेव्हा तिला मिळालेली शिकवण ही कायमच आडवी येते. त्यानंतर आपण चुकीचा रस्ता पकडला आहे, चुकीच्या माणसाबरोबर, हे जेव्हा कळतं, असं वाटतं तेव्हा कुठलीही मुलगी लग्न टिकवण्याचा प्रयत्न करते.''
7 / 10
''मीही ते केले. मी लग्न टिकवण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण कुठेतरी असं झाले की डोक्यावरुन पाणी जायला लागलं. पण त्या काळात मी एकटी आहे, हे कधीही दाखवलं नाही.''
8 / 10
मी त्यांच्या घरी धुणी भांडी करण्यापासून झाडू काढणे, लादी पुसणे यासर्व गोष्टी केल्या आहेत. मी मनापासून या सर्व गोष्टी केल्या. जरी स्वतची चूक असेल ना तरी ही तुझी चूक आहे आणि तुझ्यामुळे मी ही चूक केली, असं म्हणणारी ही लोक आहेत. त्यांच्यामुळे मी माझ्या स्वत:वर संशय घ्यायला लागले होते”, असेही तिने यावेळी सांगितले.
9 / 10
घटस्फोटाबद्दल बोलताना मानसी नाईक भावुक झाली, “प्रत्येक मुलीच्या बकेट लिस्टमध्ये ही इच्छा असते की तिने लग्न करावं, तिचं कुटुंब असावं. मी लग्नानंतर बांगड्या, भांगेत कुंकू या सर्व गोष्टी प्रेमाने केल्या. पण काही असे लोक असतात, जे लग्नसंस्था, सप्तपदी, मेहंदी यांसारख्याचा अनादर करतात. त्याचा माजही दाखवतात. जा केलं तर काय, असंही म्हणतात. पण आता मी यातून बाहेर पडली आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे.”
10 / 10
मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचे लग्न १९ जानेवारी २०२१ ला पार पडले होते. त्याआधी काही काळ ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. मात्र आता लवकरच ते दोघेही विभक्त होणार आहेत.
टॅग्स :मानसी नाईकघटस्फोट