actress Mohena Kumari And Family Test Positive For COVID-19 TJL
'ये रिश्ता क्या कहलाता है'मधील अभिनेत्रीला झाली कोरोनाची लागण By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 04:02 PM2020-06-02T16:02:10+5:302020-06-02T16:02:10+5:30Join usJoin usNext छोट्या पडद्यावरील मालिका ये रिश्ता क्या कहलाता हैमधील अभिनेत्री मोहिना कुमारी सिंगला कोरोनाची लागण झाली आहे. मोहोना ही उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज यांची सून आहे. सतपाल यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील आणि बाहेरच्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी मोहेनासोबतच १७ जणांचे रिपॉर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मोहेनाने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेसोबतच सिलसिला प्यार का, प्यार तुने क्या किया, गुमराह यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती एक अभिनेत्री असण्यासोबतच एक खूप चांगली डान्सर देखील आहे. डान्स इंडिया डान्स या प्रसिद्ध कार्यक्रमाचा देखील ती भाग होती.टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैकोरोना वायरस बातम्याYeh Rishta Kya Kehlata Hai Serialcorona virus