Join us

९ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतीये 'ही' अभिनेत्री, माजी खासदारासोबत करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 17:12 IST

1 / 7
हिंदी आणि बंगाली सिनेमांमध्ये एकेकाळी अभिनेत्री आघाडीवर होती. तिने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं.
2 / 7
ती अभिनेत्री मौसमी चॅटर्जी (Moushumi Chatterjee) आता १२ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. 'आरी' सिनेमात त्या झळकणार आहेत. नुसरत जहाँ देखील त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसतील.
3 / 7
नुसरत जहाँ (Nusrat Jahan) आणि मौसमी चॅटर्जी दोघी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर दिसणार आहेत. नुसरत जहाँ यांचा पार्टनर अभिनेता यश दासगुप्ता सुद्धा या सिनेमाचा भाग असणार आहेत.
4 / 7
सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. यामध्ये मौसमी यांनी यशच्या आईची भूमिका साकारली आहे. नुसरत जहाँ आणि यश यांच्या प्रोडक्शनमध्ये हा सिनेमा बनत आहे.
5 / 7
२०१३ साली आलेल्या 'गोयनाप बक्शो' सिनेमात त्या दिसल्या होत्या. हा बंगाली सिनेमा होता. तसंच 'पिकू' या हिंदी सिनेमातही त्यांनी काम केलं होतं.
6 / 7
मौसमी यांनी ५५ व्या वर्षांच्या करिअरमध्ये १०० हून जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. १९६७ साली 'बालिका वधू' बंगाली सिनेमातून पदार्पण केलं होतं.
7 / 7
१९७२ साली त्यांनी 'अनुराग' सिनेमातून हिंदीत पदार्पण केलं. त्यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जितेंद्र कुमार यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.
टॅग्स :मौसमी चॅटर्जीबॉलिवूडनुसरत जहाँसिनेमा