Nusrat Jahan : अभिनेत्री नुसरत जहांने बाळाला दिला जन्म, वादानंतरही सोडलेल्या पतीने दिली पहिली प्रतिक्रिया By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 5:48 PM1 / 10बंगाली अभिनेत्री आणि टीएमसीच्या खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) यांच्यासाठी २६ ऑगस्ट हा फारच खास दिवस आहे. कारण या दिवशी त्यांनी एका बाळाला जन्म दिला. नुसरत यांच्यावर या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.2 / 10नुसरतसोबत तुर्कीमध्ये लग्न करणारा निखिल जैनही (Nikhil Jain) यात मागे नाही. सगळे मतभेद आणि भांडणं बाजूला सारून निखिलने नुसरत आणि तिच्या बाळाला शुभेच्छा दिल्या आहेत.3 / 10आजतक बांगलासोबत बोलताना निखिल जैन म्हणाला की, 'नुसरत जहांसोबत माझं भांडण आहे. नव्या पाहुण्याला शुभेच्छा देण्यापासून ती मला रोखू शकत नाही. मी नुसरतला शुभेच्छा देतो. बाळ हेल्दी रहावं आणि त्याचं भविष्य चांगलं रहावं'.4 / 10दरम्यान नुसरत जहां आणि निखिल जैन यांनी १९ जून २०१९ मध्ये तुर्कीच्या बोडरम शहरात ग्रॅंड वेडींग केलं होतं. त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. त्यांचे लग्नाचे फोटोही व्हायरल झाले होते.5 / 10लग्नानंतरही त्यांचं प्रेम सोशल मीडियावरून बघायला मिळालं. दोघेही एकमेकांचे रोमॅंटिक फोटो शेअर करत होते. ते सोबतच सणही साजरे करत होते.6 / 10पण लग्नाच्या दोन वर्षातच दोघांमध्ये दरी निर्माण झाली. दोघे वेगळे झाले. त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोपही लावले. इतकंच काय तर नुसरतने तर निखिलसोबतच लग्नच अमान्य केलं होतं.7 / 10नुसरत म्हणाल्या होत्या की, आमचं लग्न तुर्कीमध्ये झालं आणि आम्हाला हे लग्न हिंदू मॅरेज अॅक्टनुसार रजिस्टर करायचं होतं. जे केलं नाही. त्यामुळे हे लग्नच लिगल नाही तर घटस्फोटाचा प्रश्नच येत नाही. त्यांनी या नात्याला लिव-इन रिलेशनशिपचं नाव दिलं होतं.8 / 10या सर्वात नुसरत यांच्या प्रेग्नेन्सीची बातमी समोर आली होती. यावर निखिलने स्पष्ट केलं होतं की, त्याला माहीत नाही की नुसरत प्रेग्नेंट आहे की नाही. जरी असेल तरी ते बाळ माझं नाही. कारण बऱ्याच महिन्यांपासून आम्ही सोबत राहत नाही.9 / 10या सगळ्या वादाच्या मधेच नुसरत यांचं नाव बंगाली अभिनेता यश दास गुप्तासोबत जोडलं गेलं. अशीही चर्चा होती की, नुसरत आणि यश यांनी एकत्र काही प्रोजेक्ट्स केले त्यानंतर ते जवळ आले.10 / 10असं असलं तरी नुसरत आणि यश यांच्या अफेअरच्या बातम्यांना त्यांच्याकडून काहीच कन्फर्मेशन मिळालं नाही. आता नुसरत आई बनल्या आहे तेव्हा यश दास गुप्ता सतत त्यांच्यासोबत दिसला. त्यानेच बाळ ठीक असल्याची माहिती दिली. आणखी वाचा Subscribe to Notifications