Join us

Nusrat Jahan : नुसरत जहांने मुलाचं नाव केलं जाहीर, 'या' अभिनेत्यासोबत आहे नावाचं कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 2:33 PM

1 / 8
बंगाली अभिनेत्री नुसरत जहांने २६ ऑगस्ट रोजी एका मुलाला जन्म दिला. नुसरत जहां आई झाल्यापासून चर्चेत आहे. सोबतच ती बाळाला कुणाचं नाव देणार याचीही चर्चा झाली. पण तिने बाळाच्या वडिलांचं नाव रिव्हिल केलं नाही. अशात आता तिने आपल्या बाळाचं नाव जाहीर केलं आहे. (All Image Credit : Nusrat Jahan Insta)
2 / 8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुसरत जहांने आपल्या मुलाचं नाव ईशान ठेवलं आहे. हे नाव इंग्रजीत 'Yishaan' असं लिहिलं जाईल. आता सोशल मीडियावर तिच्या बाळाच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे.
3 / 8
दरम्यान नुसरत जहां यांचं लग्न जून २०१९ मध्ये निखिल जैनसोबत झालं होतं. हे लग्न त्यांनी तुर्कीमध्ये केलं होतं. या लग्नाची जोरदार चर्चाही रंगली होती आणि त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. पण आता ती निखिल जैनसोबत राहत नाही.
4 / 8
नुसरतने निखिल जैनसोबतचं लग्न लिगल नसल्याचं काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं. म्हणजे तिला हे लग्न मान्य नाही. नुसरत म्हणाली होती की, तिचं लग्न हिंदू मॅरेज अॅक्टनुसार रजिस्टर नाही. त्यामुळे हे लग्न तिला मान्य नाही.
5 / 8
नुसरतने निखिल जैनसोबतच्या नात्याला लिव्ह-इन रिलेशनशिप नातं असं नाव दिलं. तेच नुसरतच्या बाळाबाबत निखिल जैन म्हणाला होता की, हे बाळ त्याचं नाहीये. कारण ते बऱ्याच महिन्यांपासून सोबत राहत नाहीत.
6 / 8
दुसरीकडे नुसरत जहांचं बंगाली अभिनेता यशदास गुप्तासोबत अफेअर असल्याची चर्चा आहे. पण दोघांही कधीही त्यांच्या रिलेशनशिपबाबत जाहीरपणे काही सांगितलेलं नाही. पण ते नेहमीच सोबत दिसतात.
7 / 8
मीडिया रिपोर्टनुसार, नुसरतच्या डिलेव्हरीवेळी यशदास गुप्ता तिच्यासोबत होता. यश यानेच नुसरतला बाळ झाल्याची माहिती सर्वांना दिली होती. सोबतच हेही सांगितलं होतं की, नुसरत आणि नुसरतचं बाळ ठीक आहे.
8 / 8
अशात नुसरतच्या मुलाच्या नावाचं कनेक्शन यशदास गुप्ताच्या नावासोबत असल्याची चर्चा होत आहे. कारण हे नाव इंग्रजीत 'Yishaan' असं लिहिलं जाणार आहे. तर अभिनेत्याचं नाव यश आहे. पण याबाबतही अधिकृत असं काहीही सांगण्यात आलेलं नाही.
टॅग्स :नुसरत जहाँप्रेग्नंसी