Actress Rakul Preet Singh tested negative for COVID-19, shared this news by social media
रकुल प्रीत सिंगने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना दिली ही गुड न्यूज By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 03:52 PM2020-12-30T15:52:08+5:302020-12-30T15:52:08+5:30Join usJoin usNext अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने कोरोनावर मात केली असून तिचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे. रकुलला कोरोनाची लागण झाली असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले होते. तसेच तिच्या संपर्कात आलेल्या लोकांनी टेस्ट करून घ्यावी असे देखील तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. गेल्याच महिन्यात रकुल मस्त व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसली होती. व्हॅकेशन दरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रकुलने तिच्यासाठी प्रार्थना केलेल्या तिच्या फॅन्सचे सोशल मीडियाद्वारे आभार मानले आहेत. रकुलने तिच्या फॅन्सना काळजी घेण्याचे आणि मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. रकुलने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. रकुल काही दिवसांपासून ‘मेडे’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अंगिरा धर, अजय देवगन यांच्या मुख्य भूमिका आहेत.टॅग्स :रकुल प्रीत सिंगRakul Preet Singh