1 / 10बॉलिवूड अभिनेत्री रंभा गेल्या काही वर्षांपासून लाईमलाईटपासून दूर आहे. पण सध्या रंभाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 2 / 10 रंभाने अतिशय कमी वयात अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. केवळ 15 वर्षांची असताना तिने एका दाक्षिणात्य चित्रपटात काम केले होते. 3 / 10तिच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे तिला दाक्षिणात्य चित्रपटांच्या अनेक आॅफर मिळाल्या लागल्या. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 4 / 10रंभाने आजवर 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी रंभाने आपला पहिला चित्रपट साईन केला होता. 5 / 101995 मध्ये ‘जल्लाद’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड एन्ट्री घेतली. यानंतर दानवीर,जंगल,कहर, जुडवां,सजना,घरवाली बाहरवाली, बंधन,मैं तेरे प्यार में पागल, क्रोध, बेटी नंबर वन, दिल ही दिल में, प्यार दिवाना होता है अशा अनेक चित्रपटांत रंभा दिसली. 6 / 10एकेकाळी रंभाला दिव्या भारतीची डुप्लिकेट म्हणून ओळखले जात होते. सलमानच्या बंधन, घरवाली बाहरवाली, बेटी नं.1 यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले.7 / 10 2010 मध्ये रंभाने इंद्र्रकुमार प्रथमन्थान या व्यवसायिकासोबत लग्न केले. रंभाचा पती मुळचा चेन्नईचा असला तरी त्यांचा व्यवसाय टोकियोत आहे. 8 / 10रंभाचा पती मॅजिकवुड्स नामक कंपनीचा चेअरमन व सीईओ आहे. कॅनडास्थित ही कंपनी किचन कॅबिनेट आणि व्हॅनिटी व्हॅन बनवते. 9 / 10मध्यंतरी रंभा व तिच्या पतीत मतभेद असल्याची बातमी समोर आली होती. दोघांचेही प्रकरण घटस्फोटापर्यंत ताणले गेले होते. पण कालांतराने हे मतभेद मिटलेत. आता रंभा आपल्या संसारात आनंदी आहे.10 / 10रंभा पती व तीन मुलांसोबत गेल्या काही वर्षांपासून आपल्या कुटुंबियांसोबत टोकियोमध्येच राहाते. त्या दोघांना दोन मुली असून एक मुलगा आहे. तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर तिचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात.